नागोठणे येथील श्री अष्टविनायक पतसंस्थेला कोकण पतसंस्था भूषण पुरस्काराच्या द्वितीय क्रमांकाचे मानकरी

Nagothane Pathapedhi Award
नागोठणे ( महेंद्र माने) :
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला माननीय विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था , कोकण विभाग नागरी व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्या. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पतसंस्थेंना देण्यात येणारा कोकण पतसंस्था भूषण 2025 पुरस्काराचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
सतीश धारप व कमळ नागरी सह. पतसंस्था,अलिबाग प्रायोजित रविवार 16 फेब्रुवारी रोजी क्षात्रौक्य समाज हॉल कुरुळ अलिबाग येथे झालेल्या सदरील पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात नागोठणे येथील अग्रगण्य असलेल्या श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला कोकण पतसंस्था भूषण 2025 चे 5000 रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे स्वरूप असलेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत काकासाहेब कोयटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन,पुणे यांच्या हस्ते पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर, उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी, सेक्रेटरी प्रफुल नागोठणेकर यांच्यासह खजिनदार रतन हेंडे, तज्ञ् संचालक प्रकाश जाधव, संचालिका श्वेता चौलकर, वृषाली जोगत, संध्या सांगले, व्यवस्थापिक शैला घासे, सुजित चौलकर,कविता जाधव,अशोक गायकवाड यांनी स्वीकारला.
सदरील कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे,निवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, मा.आमदार निरंजन डावखरे, कोकण विभाग नागरी सह. पतसंस्था अध्यक्ष गिरीश तुळपुळे, आदी मान्यवरांसह कोकणातील विविध पतसंस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. श्री अष्टविनायक पतसंस्थेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल नागोठणे शहर व विभागातून अध्यक्ष विलास चौलकर व संचालक मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading