नागोठणे पोलिस स्टेशन स्मार्ट पोलीस ठाणे पुरस्कारानं सन्मानित

Nagothane police sachin kulkarni
नागोठणे (महेंद्र माने) :
पोलिस ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाणे पुरस्कार तसेच ISO 9001:2015 नुसार A++ या अति उत्कृष्ट श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आहे. सदरील पुरस्कार शनिवार 19 एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या हस्ते नागोठणे पोलिस ठाण्याचे सहा. पो.नि. सचिन कुलकर्णी यांना देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी आपल्याला मिळालेले स्मार्ट पोलीस ठाणे पुरस्कार तसेच ISO 9001:2015 नुसार A++ या अति उत्कृष्ट श्रेणी हे सर्व माझ्या टिमच्या मेहनतीमुळे शक्य होत असल्याचे सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना सचिन कुलकर्णी यांनी सांगितले की, जनतेच्या सेवेसाठी नागोठणे पोलीस ठाणेमध्ये सर्व ठिकाणी विविध सूचना फलक लावणे, अभ्यासगत कक्ष तयार करणे,येणार्‍या जनतेला बसण्यासाठी सुसज्य आसन व्यवस्था, तक्रारदारांसाठी व्हिजिटर बुक ठेवणे,पिण्याचे पाणी व्यवस्था करणे, प्रसाधनगृहाची व्यवस्था तसेच सुसज्य प्रतीक्षालय बनवणे यासारखे साधारण 37 सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलीस ठाणेचे स्वरूप पूर्णतः बदलून टाकण्यात आलेले आहे.
या सर्व निकषांच्या आधारावर तसेच येथे आलेल्या प्रत्येक नागरिकांना सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असून आलेल्या प्रत्येकाची तक्रार ऐकुन त्यांना योग्य तो सल्ला व मदत करीत असल्याचे सांगून माझ्या सर्व टिमने घेतलेल्या मेहनतीमुळे सदरील उपरोक्त पुरस्कार नागोठणे पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे शेवटी सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.
सदरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नागोठणे शहर व विभागातून नागोठणे पोलीस ठाणेचे सहा.पो.नि.सचिन कुलकर्णी व त्यांच्या टिमचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading