नागोठणे : नागोठणे पत्रकार संघाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा शनिवार 27 मे रोजी ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी 06.00 वाजता साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
या सोहळ्यात जयवंत माडपे, खोपोली (कै. रामचंद्र पुरुषोत्तम पत्की ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार),
मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग (कै. विजय संतुराम देशपांडे उत्कृष्ट सरकारी सेवक पुरस्कार),
उमाजी केळुसकर, अलिबाग (कै. नवीन नारायण सोष्टे साहित्यिक पुरस्कार),
मंगेश दांडेकर (कै. शैलेंद्र विजय देशपांडे आदर्श समाजसेवक/लोकसेवक पुरस्कार),
आणि ज्ञानेश्वर दळवी (कै. सनिल उदय भिसे उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार) यांना गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यानाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार रवींद्र पाटील, आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सह संपर्क प्रमुख किशोर जैन, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी सरपंच नरेंद्र जैन, मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते दिलीप टके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय भिसे,सल्लागार राजेश पोवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव महेंद्र माने, उपाध्यक्ष किरण लाड, सहसचिव मनोहर सकपाळ, खजिनदार पुरुषोत्तम घाग, सल्लागार- सुधाकर पत्की,ज्ञानेश्वर दळवी, सदस्य- नंदकुमार देशपांडे, नारायण म्हात्रे,प्रज्ञा पोवळे, मिलिंद घाग, संकल्प माने,अर्चित भिसे, संदेश गायकर या सोहळ्याचे नियोजन करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.