नागोठणे पत्रकार संघाने दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी, किल्ले स्पर्धेचे शुक्रवार 03 जानेवारी रोजी ग्रा.प.च्या शिवगणेश सभागृहात सरपंच सुप्रिया संजय महाडीक, उपसरपंच अकलाक पानसरे, वरवठणे सरपंच ऋतुजा म्हात्रे, सहा. पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पिगोंडे माजी सरपंच संतोष कोळी,को.ए.सो. मुख्याध्यापिका राधिका ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड, संघाचे अध्यक्ष उदय भिसे,सल्लागार राजेश पोवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी नागोठणे पत्रकार संघाने कलाकारांसाठी दालन खुले केले असून ते घेत असलेल्या या स्पर्धा भविष्यात विभागातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याचे प्रतिपादन मा.जि.प. सदस्य किशोर जैन यांनी केले.
यावेळी प्रमोद कदम, ग्रा.पं.सदस्य ॲड. प्रकाश कांबळे व संतोष नागोठणेकर, सदस्या- शबाना मुल्ला,सुप्रिया काकडे व भाविका गिजे, रा.कॉं. विभागिय उपाध्यक्ष दिनेश घाग, शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख धनंजय जगताप, भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी, शिव व्याख्यानकर्ते प्रल्हाद पारंगे,उदंड रावकर,सुनील लाड,गंगाराम मिणमिने,भरत गिजे यांच्यासह किल्ले परिक्षक संजय अधिकारी, रांगोळी परिक्षक सुप्रिया परदेशी तसेच स्पर्धक व नागरीक उपस्थित होते.
रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक अर्चना मिनमिने-आंबेघर, व्दितीय क्रमांक- आस्था म्हात्रे,वरवठणे,तृतीय क्रमांक- मानसी ताडकर, मुरावाडी तसेच उत्तेजनार्थ- सानिका दळवी, नागोठणे व प्रांजळ म्हात्रे,वरवठणे तसेच किल्ले स्पर्धा प्रथम क्रमांक- नम्रता पारंगे,वेलशेत, व्दितीय क्रमांक– वरद खंडागळे- नागोठणे, तृतीय क्रमांक- ऐश्वर्या शहासने,वेलशेत तसेच उतेजनार्थ तन्मय नागोठणेकर व यश पाटील,नागोठणे तसेच सुप्रिया परदेशी व संजय अधिकारी यांच्यासह सर्वात लहान स्पर्धक किमया महेश डुंबरे हिचाही विशेष सत्कार म्हणून पुष्पगुच्छ,स्मृतीचिन्ह व प्रशस्ती पत्रक व स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनाही प्रशस्ती पत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करताना किशोर जैन यांनी सांगितले की, नागोठणे पत्रकार संघाने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवीत सत्तावीस वर्ष पूर्ण केली. पत्रकार संघाने कलाकारांसाठी खुले दालन केले असून भविष्यात या स्पर्धा विभागातील कानाकोपऱ्यात पोहचनार आहेत.त्यांच्या चांगल्या उपक्रमाला माझे पूर्ण सहकार्य राहील. गेल्या वर्षी या ठिकाणी मी दिलेल्या शब्दाप्रमाणे मेडिकल कॉलेज येथे आणला असून देशातील मुले प्रवेश घेत आहेत. येथील मुलांनी फक्त स्पर्धा परीक्षेत चांगले मार्क काढायाचे बाकी सर्व जबाबदारी माझी असल्याचे सांगून मुलांची स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी पालकांबरोबरच पत्रकार संघानेही प्रयत्न व सहकार्य करण्याचे आवाहन शेवटी किशोर जैन यांनी केले.
संतोष कोळी यांनी पत्रकार संघ मुलांना मोबाईल मधून बाहेर काढत चांगले कलाकार निर्माण होण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असतात यासाठी लागणारे सर्व सहकार्य माझे असणार असल्याचे सांगितले.
राधिका ठाकूर यांनी गड किल्ल्यांची माहिती सांगून सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याची माहिती दिली.
प्रल्हाद पारंगे यांनी इतिहासाची माहिती देताना गडावर असणारे कमळ हे लक्ष्मी व सरस्वतीचे प्रतीक तसेच गंडभेरुड आणि शरभ हे दोन अत्यंत शक्तिशाली प्रतिकात्मक प्राणी गडावर स्फूर्तिचिन्ह म्हणून कोरलेले असून गड हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे स्मारक असून ते जपणे आपले खरे कर्तव्य असल्याचे सांगितले.
सचिन कुलकर्णी यांनी शिस्तीचे दालन असलेल्या नागोठणे पत्रकार संघाचे व आमचे मैत्रीचे नाते असून त्यांची आम्हाला नेहमीच मदत मिळत असते. त्यांनी संगणकीय युगात ही स्पर्धा आयोजित केली याचा अर्थ भावी पिढी योग्य मार्गावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
भिसे यांनी आपल्या प्रस्तावनेत संघाच्या कार्याची माहिती देऊन असेच वर्षभरात विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण म्हात्रे यांनी केले तर आपल्या आभार प्रदर्शनात राजेश पोवळे यांनी आपल्या आभार प्रदर्शनात आपले ज्ञान दुसर्याला दिल्याने ते अधिक वाढत असल्याचे सांगून आमचा संघ फक्त पत्रकारीताच न करता सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असून विभागातील समाजाच्या विविध घटनेपर्यंत विविध माध्यमातून पोहचण्याचा प्रयत्न करीत असून आम्ही राबवित असलेल्या प्रत्येक उपक्रमाला आपले सर्वांचे पाठबळ नेहमीच मिळत असल्याने यापुढेही असेच चांगले उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष उदय भिसे,सल्लागार राजेश पोवळे,सचिव महेंद्र माने व स्पर्धा प्रमूख रोशन पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर सकपाळ,संदेश गायकर,नारायण म्हात्रे, संकल्प माने यांनी अपर मेहनत घेतली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.