नागोठणे नगरीत हर हर महादेव; महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी

Nagothane Shivaji Mandir
नागोठणे (महेंद्र माने) :
प्रभुआळीतील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी. के. पी.) समाजाच्या रामेश्वर मंदिर व ब्राह्मण समाजाच्या नवीन रामेश्वर मंदिरात बुधवार 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या वेळी शहर व विभागातील हजारो शिवभक्तांनी मंदिरात जाऊन शिव लिंगाचे दर्शन घेतले.
या धार्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिरामध्ये पहाटे साडेसहा वाजता संजय अधिकारी व अमिता अधिकारी या दांपत्याच्या हस्ते पूजनाने करण्यात आलं. दिवसभरात भक्त गनांच्या उपस्थितीत पूजा – अर्चा करण्यात आली.
सायंकाळी श्री रामेश्वराची काढण्यात आलेली पालखी शहरात फिरविण्यात आली. त्यावेळी प्र्यत्येक घरासमोर रांगोळी काढून नागरिकांनी मनोभावे पूजा केली.
दिवसभरात शहर व विभागातील हजारो शिवभक्तांनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर व ब्राम्हण समाजाच्या नवीन रामेश्वर मंदिरात येऊन श्री शंकराचे स्वयंभू पिंडीचे दर्शन घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह चांद्रसेनीय कायस्थ प्रभू व ब्राह्मण समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading