बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलनातील को.ए.सो.च्या कै.अ.जे.जैन प्राथमिक,गु.रा. अग्रवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात सोमवार 16 डिसेंबर रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभात शाळा समिती सभापती नरेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्यावेळी बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलनातील विद्यामंदिर हे चांगले शिक्षक व दर्जेदार शिक्षणामुळे प्रगति पथावर असल्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत असल्याचे प्रतिपादन नरेंद्र जैन यांनी केले.
यावेळी प्राथ.शाळा समिती चेअरमन अनिल काळे,शाळा समिति सदस्या सोनल जैन,सदस्य – राजेंद्र जैन,जयराम पवार व सुभाष जैन,मा.सरपंच विलास चौलकर,भास्कर सोलेगावकर, प्रतिभा तेरडे, अजिता घोडींदे, तानाजी लाड, सूजित चौलकर, सुप्रिया परदेशी,वर्षा देशपांडे यांच्यासह माध्य.शाळा मुख्याध्यापिका राधिका ठाकुर,प्राथ. शाळा मुख्याध्यापिका अनघा लोखंडे,प्रा.श्रीकृष्ण तुपारे,स्नेह संमेलन कार्याध्यक्षा पी.एस.दरेकर,उपकार्याध्यक्ष बी.व्ही.भांगरे, राजेश्री शेवाळे,सुनील देवरे,संतोष गोळे,विद्यार्थी प्रतिनिधी – आदर्श भोय व सिध्दार्थ देवरे, विद्यार्थीनी प्रतिनिधी – जान्हवी बैकर व मिनाक्षी भालेकर तसेच शाळेचे शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिली ते बाराच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण तसेच झेप या हस्त लिखीताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाल्यानंतर आपल्या अध्यक्षीय मनोगतात नरेंद्र जैन यांनी आपल्या विद्यासंकुलनात येथील विभागातील गोर गरीब व गरजू मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेतील चांगले शिक्षक व दर्जेदार शिक्षणामुळे शाळा प्रगति पथावर असल्याने दर वर्षी विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत आहे. यावर्षी अकरावी प्रवेशासाठी नवीन तुकडी काढता येत नसल्याने 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ न शकल्याची खंत आहे. सर्वांच्या ग्रामदैवत जोगेश्वरी मातेची कृपा व आशीर्वादाने शाळा प्रगति पथावर असल्यामुळेच शाळा व महाविद्यालयाचे नाव लौकिक आहे. या वर्षी महाविद्यालयात नवीन शेड तयार केली असल्याचे सांगून पुढील दोन वर्षात शाळेची जुनी इमारत पाडून नवीन बांधण्याचा मानस असून जेणे करून विद्यार्थ्यांना बसण्याची सुव्यवस्था व चांगले शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहे. तसेच बारावी बोर्ड परीक्षेत कोकण एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये आमच्या विद्यामंदिरातील सूरज सुरेश ठाकुर हा शास्त्र शाखेत दुसर्या क्रमांक तर भाग्यश्री दत्ताराम ठाकुर ही कला शाखेत पाचव्या क्रमांकावर आल्याबद्दल या दोन विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे चेअरमन नरेंद्र जैन यांनी सांगितले.
यावेळी जयराम पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सुनील देवरे तर उपस्थितांचे आभार बी.व्ही.भांगरे यांनी मानले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.