एसटी स्थानक आवारात पाली – कोलाड मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने सर्व अबालवृध्दांसह विद्यार्थ्यांना बसची वाट बघत रणरणत्या ऊनात ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे तेथे निवारा शेड तातडीने होण्याची मागणी प्रावाशी वर्गाकडून होत आहे.
नागोठणे हे एस.टी.स्थानक म्हणजे राज्य परिवहन मंडळाचे मध्यवर्ती ठिकाण. या ठिकाणाहून मुंबई,पुणे,नाशिक,शिर्डी,अलिबाग,मुरुड,
श्रीवर्धन,महाड- पोलादपूरसह कोकण व घाट माथ्यावर जाणार्या लांब पल्याच्या गाड्या या स्थानकामध्ये ये – जा करीत असतात. मुंबईकडे जाणारे प्रवाशी बसची वाट बघताना एसटी स्थानकाचा वापर करू शकतात. परंतु पाली,पुणे,नाशिक तसेच कोलाड,श्रीवर्धन, महाड व कोकणात जाणार्या प्रवाशांना स्थानकासमोरील रसवंती गृहाच्या बाजूला रार्व प्रवाशांना उन्हात उभे राहून बराच वेळ बसची वाट पहावी लागते. तेथे शेड नसल्याने वयोवृध्द, लहान मुले,महिलांसह शाळा- कॉलेज विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात कडक उन्हात तर पावसाळ्यात मुसळधार पावसात उभे राहावे लागते.
तसेच समोर विरुद्ध बाजूला बस स्थानकात बसायचे म्हटले तर समोर आलेली बस कोणती आहे ते दिसत नाही जर का आपली बस आल्याचे समजले तर पलीकडे जाण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामध्ये मुंबई,रोहाकडे जाणार्या गाड्याचा धक्का लागला तर मोठा अनर्थ होऊ शक्यत असल्याने बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हा धोका पत्करून व सर्व धावपळ करून जर का एकाद्या प्रवाशांची नियोजित बस निघून गेली तर त्यांची मोठी कुचंबना होत असते. प्रवाशांना या सर्व होणारा त्रास व असलेली गैरसोय दूर होण्यासाठी या ठिकाणी तातडीने प्रवाशी शेड होणे गरजेची असल्याची मागणी प्रवाशी वर्ग करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.