नागोठणे शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत पसरवली असून बुधवार 23 एप्रिल रोजी शहरातील विविध भागात सतरा जणांचे लचके तोडले. सर्व जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले तर काहींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय पाठविण्यात आले आहे.
सदरील पिसाळलेल्या कुत्र्याने बुधवारी दिवसभर धुमाकूळ घालत शहरात दहशत पसरवली आहे. ऐन उन्हाळाच्या हंगामात कुत्र्याने शहरातील मीरानगर,आंगर आळी,जोगेश्वरी नगर,बाळासाहेब ठाकरे नगर, कोळीवाडा, मोहल्ल्यासह विविध विभागातील साधारण सतरा पेक्षा जास्त लहान मुले व तरुणांना दिसेल तेथे लचके तोडले आहे.
सदरील कुत्र्याने धुमाकुळ घातल्याने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केले. तसेच काही गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय पाठविण्यात आले असून सतरा जणांना चावा घेतल्याची नोंद झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांनी दिली.
———————————–
शहरातील सर्व जनतेस जाहीर आवाहन करणेत येत आहे कि, शहरामध्ये गेले दोन दिवसापासून एक पिसाळलेला कुत्रा सर्वत्र फिरत आहे. त्याने अनेक जणांवर हल्ला करून जखमी केले आहे.त्या कुत्र्यापासून सावधानता बाळगून आपली काळजी घ्यावा.सदरील कुत्रा दिसताच तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात कळवावे किंवा समाधान सोनावळे 9021613271 या क्रमांकावर संपर्क करावे. जेणे करून त्याचा योग्य तो बंदोबस्त करता येईल
…राकेश टेमघरे,ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत,नागोठणे
———————————–
रेबीज(Rabies) कुत्रा शहरात फिरत असून तो अनेकांचा चावा घेत आहे.त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. कुत्रा चावल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा. कुत्रा चावल्यास Rabies vaccine आणि Antirabies serum आणि inj.T.T.एवढी इंजेक्शन घेणे जरुरी आहे.
….डॉ.सुनील पाटील, नागोठणे
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.