
नागोठणे ( महेंद्र माने ) :
नागोठणे येथील अंबा नदी विसर्जन घाटामध्ये मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या गणरायाला 11 व्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व गणेश भक्तांना नागोठणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व किशोरभाई जैन मित्र मंडळाच्या वतीने सलग 33 व्या वर्षीही मोफत शिव वडापावचे वाटप करण्यात आले.
नागोठणे शिवसेना व किशोरभाई जैन मित्र मंडळाच्या किशोर जैन,अरविंद जाधव,विलास चौलकर,बाळा जावरे,संजय महाडीक,शंकर पाटील यांनी एकत्र येऊन शिवसैनिकांच्या मदतीने साधारण 1992 साली अनंत चतुर्थीला गणेश विसर्जनाच्या वेळी अंबा घाटात येणा-या प्रत्येक गणेश भक्तांना सुरूवातीला शिवसेना शाखेत कांदा पोहा नंतर विसर्जन घाटावर शिव वडापावचे वाटप सुरू केले.
यावर्षी त्याला 33 वर्षे पूर्ण होत असून या वर्षी साधारण 13,000 वडापावचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती धनंजय जगताप यांनी दिली असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना रा.जि. सहसंपर्क प्रमुख किशोर जैन,उपविभागप्रमुख संजय महाडीक, मा. डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अकलाक पानसरे व शाखाप्रमुख धनंजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शहर संघटिका प्राणिता पत्की,संजय काकडे,बाळू रटाटे,राजू पिताणी,प्रकाश कांबळे,कार्तिक जैन,सोहेल पानसरे,सुरेश गिजे,शैलेश रावकर,भरत गिजे,जितेंद्र जाधव,मुकेश भोय,अनिल महाडीक,संजय पिंपळे,रुपेश नागोठणेकर,ऋत्विज माने,यश रावकर,आकाश वाघमारे,सुरेश कांबळे यांच्यासह सर्व शिवसैनिक तसेच वडेवाले महाडीक बंधु व त्यांच्या सहका-यांनी अपार मेहनत घेतली. यावेळी हा उपक्रम असाच पुढे अखंड चालू राहणार असल्याचे किशोर जैन यांनी सांगितले.