
सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :
अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे नवरात्रोत्सव निमित्ताने मापगाव शिवसेना(शिंदे गट) विभाग प्रमुख जगदीश सावंत पुरस्कृत ऑर्केस्ट्रा “जल्लोष संगीताचा” या बहारदार कार्यक्रमाचे व इतर मान्यवरांचे सत्कार समारंभाचे आयोजन सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी मुशेत येथे मांगीण देवी मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी शिवसेना(शिंदे गट) मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून केवळ सामाजिक बांधिलकी जपत मुशेत, मूनवली, सोगाव – आगर आळी येथील महिलांना मोठ्या प्रमाणात साड्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर सोमवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या ऑर्केस्ट्रा “जल्लोष संगीताचा” कार्यक्रमाचे उद्घाटन मुशेत येथील ज्येष्ठ नागरिक विलास नेवरेकर यांच्याहस्ते व मांगीण देवी मित्र मंडळ मुशेत यांचे अध्यक्ष – तेजस करळकर, उपाध्यक्ष – आदित्य करंजुकर, खजिनदार – वैभव तोंडलेकर, सचिव – सुबोध करळकर तसेच राजेंद्र करळकर, किशोर हडकर, संतोष करळकर, मुशेत पोलीस पाटील चंद्रशेखर सुर्वे, सुतेज लब्दे, निकेत घाडी, रुपेश कदम, मनीष म्हात्रे व इतर मुशेत ग्रामस्थांसह मांगीण देवी मंडळाचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमादरम्यान मूनवली येथील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अजित हरवडे तसेच मूनवली येथील माजी मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, सुनिल अनमाने, अशोक मसुरकर, प्रशांत सकरे, झिराड येथील भुपेंद्र पेठारे यांचा मांगीण देवी मंडळ मुशेत यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचवेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांचा मांगीण देवी मित्रमंडळ व मुशेत ग्रामस्थांतर्फे विशेष जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पिंट्या गायकवाड यांनी जगदीश सावंत व मांगीण देवी मंडळाला शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार महेंद्र दळवी यांचे कट्टर समर्थक व शिवसेना(शिंदे गट) मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे मापगाव विभागातील विकासकामांसाठी पाठपुरावा करून एमएमआरडीए च्या माध्यमातून तब्बल २२ कोटी ५० लाख रुपयांचा तसेच मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामांसाठी तब्बल २ कोटी ७० लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर करून आणल्याबद्दल व गावाच्या विकासासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणात तन, मन, धन लावून योगदान देत असल्याबद्दल मांगीण देवी मंडळातर्फे व मुशेत ग्रामस्थांनी विशेष जाहीर सत्कार केला.
शिवसेना(शिंदे गट) मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत पुरस्कृत तसेच रोहित पाटील प्रस्तुत ऑर्केस्ट्रा “जल्लोष संगीताचा” या कार्यक्रमात शिवरत्न भूषण ‘एकच राजा इथे जन्मला’ फेम गायक – रोहित पाटील, रायगड चा बुलंद आवाज – योगेश कुमार, लावणी सम्राज्ञी – नेहा मुंबईकर, गायिका – पूजा म्हात्रे, गायिका – मैथिली भगत यांनी आपल्या गायन, लावणी आदी बहारदार कलागुणांचा कार्यक्रम सादर करीत तसेच आपल्या भारदस्त आवाजात सूत्रसंचालन करणारे संतोष वाघमारे यांनी सर्वच रसिकांना खिळवून ठेवले होते. या सर्व कलाकारांचा अप्रतिम कलागुण सादर केल्याबद्दल कार्यक्रमाचे पुरस्कर्ते जगदीश सावंत व मांगीण देवी मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे विशेष कौतुक करत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मुशेत पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांसह सर्व गटातील महिला व पुरुष ग्रामस्थ आणि मांगीण देवी मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.