माणगांव ( रविंद्र कुवेसकर ) : नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाचे आयोजन करुन शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहीजे. शहरांमध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक असल्याने प्रशासनाने शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिलेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात पैकी एक माणगांव नगरपंचायत हद्दीतही शुक्रवार दि.०४ ऑगस्ट रोजी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
माणगांव नगरपंचायत हद्दीतील कचेरी रोड, महेंद्र ज्वेलर्स ते वाकडई देवी मंदिर परिसरात माणगांवचे उप विभागीय अधिकारी (प्रांत) डाॅ. संदीपान सानप यांच्या मार्गदर्शनात आणि तहसिलदार विकास गारूडकर व नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या नेतृत्वात, अपर तहसीलदार विनायक घुमरे, तालुका कृषी अधिकारी अजय वगरे, वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे, नगरपंचायतचे स्वच्छता व आरोग्य सभापती दिनेश रातवडकर यांचे मुख्य उपस्थितीत संपूर्ण नगर पंचायत कर्मचारी, सफाई कामगार व मोठ्या संख्येने उपस्थित माणगांव मधिल शालेय तसेच काॅलेज विद्यार्थी व त्यांचे मुख्याध्यापक, साबळे विद्यालयाचे प्रिन्सिपल धनाजी जाधव, श्रध्दा इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापक बिजांक्षी राय (हेगडे) मॅडम व शिक्षक, रायगड भूषण पत्रकार रविंद्र कुवेसकर तसेच महसुल, वन, कृषी विभाग अधिकारी, कर्मचारीवर्ग या अभियानात सहभागी झाले होते.
मुख्याधिकारी यांचे नियोजनानुसार प्रत्येकास विभागुण दिलेल्या टप्प्यातील प्लास्टिक कचरा, गवत अनावश्यक झाडी-झुडपांची स्वच्छता ही तोंडाला मास्क, हँण्डग्लोव्हज वापरीत, हाती सराटा, फावडी, कोयती आदी साहित्य घेऊन सकाळी सहा वाजता स्वच्छतेस सुरुवात करुन जवळपास पाच तास ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहीमेत माणगांव नगरीचे स्वच्छता सभापती वगळता अन्य सर्वच्या सर्व नगरसेवकांची, लोकप्रतिनीधींची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली आहे. नगर पंचायतीच्या वतिने अभियानात उपस्थितीत प्रत्येकास मास्क, हँण्डग्लोव्हज तसेच पिण्याचे पाणी चहा अल्पोपाहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
नगरपंचायत शहर समन्वयक अतुल जाधव, कनिष्ठ अभियंता आकाश बुवा, कार्यालयीन कर्मचारी रामदास पवार, मंगेश पाटील यांनी अभियान यशस्वीतेसाठी खुप मेहनत घेतली. तसेच याच दिवशी पोलिस परेड मैदान, लाईन व प्रांत कार्यालय परिसरात नगर पंचायत टीमने सायंकाळपर्यंत येथील परिसर स्वच्छ केला. आपले शहर स्वच्छ, सुंदर असावे असे प्रत्येकास नुसतेचे वाटते ! परंतु या महत्त्वपूर्ण स्वच्छता अभियानास माणगांवकरांची गैरहजेरी व उदासिनता ही देखील स्पष्ट दिसून आली आहे. हे अत्यंत खेदजनक असून स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तपणे प्रत्येकाने हजर राहून सहकार्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तर आणि तरच शहर सातत्याने स्वच्छ सुंदर राखणे सहज शक्य आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.