पेण तालुक्यातील धोंडपडा येथे 119वे तुकाराम बीजोत्सव सप्ताह भक्तीमय वातावरणात पार पडला. सोमवार 10 मार्च ते 17 मार्च दरम्यान बीजोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या दिवसाला तुकाराम बीज म्हणतात. तुकाराम बीज राज्यासह पेण तालुक्यात साजरी केली जाते. संत तुकाराम महाराज पेण तालुक्यातील धोंडपाडा येथे मिरचीच्या व्यवसायानिमित्त यायचे. संत तुकाराम महाराजांचे दीडशे वर्ष पुरातन मंदिर धोडपाडा गावात आहे. सुमारे 100 वर्षांपासून येथे तुकाराम बीज साजरी करण्यात येते.
कालांतराने या मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले. मंदिराबाहेर सभा मंडप उभारण्यात आले आहे. सुरुवातीला छोटेखाणी स्वरूपात असलेल्या बिजोत्सोवात तालुकासह राज्यातील हजारो भाविक व वारकरी सहभागी होतात. संत तुकाराम बिज उत्सवात काकड आरती, ज्ञानेश्वरीचे पारायण, तुकाराम गाथेचे वाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, भजन इत्यादीचे आयोजन करण्यात आले. या बिजोत्सोवाची सांगता 17 मार्च रोजी महाराजांच्या पालखी व महाप्रसादाने होणार आहे.
यावेळी महाप्रसादामध्ये ढकु नामक पदार्थ वाटण्यात येतो. विविध भाविकांनी दिलेल्या सर्व प्रकारच्या भाज्या डाळीमध्ये टाकून ढकु तयार करण्यात येतो. तो भाताबरोबर महाप्रसादात देण्यात येतो. या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता पेण तालुक्यासह राज्यातील हजारो भाविक धोडपाडा गावात हजेरी लावतात. या भक्तीमय बिजोत्सोवाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी घ्यावा असे आवाहन तुकाराम भोईर यांनी केले आहे. पेण तालुक्यातील मोठे वढाव, तुकाराम वाडी व कणे येथेही दरवर्षी तुकाराम बीज साजरी करण्यात येते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.