धोकादायक रित्या विनापरवाना अवैध्यपणे शाळेच्या लहान मुलांची वाहतुक करणार्‍या व्यक्तीवर नेरळ पोलीसांची कार्यवाही

धोकादायक रित्या विनापरवाना अवैध्यपणे शाळेच्या लहान मुलांची वाहतुक करणार्‍या व्यक्तीवर नेरळ पोलीसांची कार्यवाही
कर्जत (गणेश पवार) :
दि.०४ एप्रिल रोजी सोशल मिडिया तथा इंटरनेट साईटवर कोणीतरी व्यक्तीने एक व्हीडीओ व्हायरल केला होता. सदर व्हिडिओ पोलीसांना प्राप्त झाला असून, त्या व्हिडिओची दखल ही रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्वतः घेऊन त्या व्हिडिओची पडताळणीचे आदेश नेरळ पोलीस ठाण्याला दिले असता, नेरळ पोलीसांनी सदर व्हीडिओची पडताळणी केली असता, त्यामध्ये कल्पेश प्रकाश कराळे रा. कोल्हारे, ता. कर्जत, जि. रायगड हा मौजे धामोते गावाचे हद्दीतील साई हॉस्पीटल समोर जिगंल प्ले शाळेसमोर अभुदय इांटरनॅशनल शाळा नेरळ असे टिर्शटवर नांव असलेले सुमारे २० अपवयीन मुले व मुलींना शाळा सुटल्या नंतर दि.०४ एप्रिल रोजी दुपारचे १२.०० वाजण्याचे सुमारास खाजगी मारूती ओमनी कारमध्ये दाटीवटीने भरून अपवयीन मुले व मुलींच्या जीवीतास धोक होईल अशा पध्दतीने भरून अवैध्यपणे मुलांची वाहतुक करीत असतानाचे दिसुन येत असल्याने कल्पेश प्रकाश कराळे यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गु.र. नं. ५६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२५ सह मोटार वाहन कायदा कलम ६६(१)/१९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असूुन, त्याच्या विरोधात पोलीस कायदेशीर कार्यवाही करीत आहे.
 यापुढे कोणीही व्यक्तीने शाळकरी मुलांचे जीवीतास धोक निर्माण होईल असे कृत्य करू नये, व विनापरवांना अवैध वाहतूक करू नये असे आवहान नेरळ पोलीसांकडून करण्यात आले आहे. अशाप्रकारे पुन्हा कृत्य करीताना कोणी अढळून आल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading