अलिबाग तालुक्यातील DCC सांबरी आयोजित क्रिकेट सामन्यात कातळपाडा संघ ठरला अंतिम विजेता. अंतिम सामना कातळापाडा विरुद्ध शिवनेरी शिहू यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर कातलपाडा संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर शिवनेरी शिहू संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक अमर विशाल कुर्डुस हा संघ मानकरी ठरला. सर्वोकृष्ट क्षेत्ररक्षक, उकृष्ट गोलंदाज, उकृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, पब्लिक हिरो, यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
धावेश्वर क्रिकेट क्लब सांबरी यांच्या वतीने रविवारी दि. 26 जानेवारी रोजी मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी विकास सीताराम पाटील संतोष पाटील, प्रदीप शेळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या सदरच्या DCC सांबरी आयोजित केलेल्या स्पर्धेला व क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील , सुनील पिंगळे , राम कर्वे, कुमार गदमले, जितेंद्र पाटील(छोटू), किशोर पाटील , मेघनाथ पाटील, राजेंद्र हशा पाटील, राजेंद्र भगवान पाटील (पोलिस पाटील), रोहिदास शेळके, विष्णु पाटील आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
सदरच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कै. दामोदर वामन पाटील र यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलं विवेक व प्रशांत पाटील तसेच नातू पार्थ यांनी एक ते तीन क्रमांकाचे चषक दिले, तसेच सर्वोकृष्ट क्षेत्ररक्षक -विशाल आडसुळे, मॅन ऑफ द सिरीज – वैभव धर्मा थळे, पब्लिक हिरो – शेखर विश्वनाथ शेळके यांनी सन्मानचिन्ह दिले. त्याच बरोबर प्रथम क्रमांकाचे परितोषिक रोख रुपये कुर्डुस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील यांनी दिले तर संघातील सर्वच खेळाडूंना अमोल पाटील यांकडून टी-शर्ट चे वाटप करण्यात आले.
मोठया उत्साही वातावरणात धावेश्वर क्रिकेट क्लब सांबरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या सामन्यांना रसिक प्रेक्षकांनी भरभरून आनंद लुटला तर संपन्न झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ तसेच खेळाडूंचा सत्कार पदाधिकार्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य संदीप पाटील(अध्यक्ष), सुशांत शेळके ,सुहास शेळके(सल्लागार) ,निखिल शेळके , सुप्रिय शेळके, कुणाल म्हात्रे ,समीर पाटील(सल्लागार), प्रणय पाटील ,अभि पाटील ,पंकज पाटील ,संजय पाटील ,शेखर पाटील(खजिनदार) ,नवनीत कर्वे, रुपेश पाटील ,अमोल पाटील ,अक्षय पाटील ,अमोघ पाटील(कप्तान) ,सुरज पाटील(कप्तान) ,राज म्हात्रे ,निलेश पाटील ,पुष्पक पाटील ,संकेत पाटील ,सुपेश शेळके(मुख्य कप्तान) ,ऋषिकेश पाटील ,राहुल म्हात्रे , सागर पाटील(उपाध्यक्ष) ,राकेश शेळके ,निवृत्ती पाटील ,चेतन पाटील, प्रशांत पाटील(उपाध्यक्ष) ,विवेक पाटील ,संकेत पाटील ,मुन्ना पाटील , भूषण पाटील, सुप्रेम गदमले ,सुजन गदमले ,प्रवीण पाटील, सुदर्शन शेळके आदि यांनी अथक परिश्रम घेतले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.