हनुमान ही भक्ती आणि शक्तीची देवता म्हणून गावोगावी विराजमान आहे..ज्यांना बजरंगबळी, मारुती, अजंनेय आणि महारुद्र नावानेही ओळखले जाते. मारूतीराया हे मर्यादापुरुषोत्तम भगवान रामांचा निष्ठावान भक्त आणि समर्थ मानले जातात. तसेच ते धैर्य, सामर्थ्य आणि भक्तीचे प्रतिक म्हणूनही ओळखले जातात… सप्त चिरंजीवांपैकी एक असलेले हनुमंतराया आजही शक्तीच्या आणि भक्तीच्या स्वरूपात जनमानसात वावरत असतात, फक्त त्यांच्या चरणी भक्तीभावाने लीन होणे गरजेचे असते..
समर्थ रामदास स्वामी हे मारुतीरायांचे निस्सीम भक्त होते. मारूतीराया म्हणजे समर्थांचे ऊर्जास्ञोत.. समर्थांनी भारतभरात असंख्य मारुती मंदिरांची स्थापना केली.. समर्थ स्थापित मारुती मंदिर जसे उत्तरेत वाराणसीला आहे तसेच ते दक्षिणेस रामेश्वरमला सुद्धा आहे..महाराष्ट्रातही सातारा येथे भक्ती शक्तीच्या संगमावर म्हणजेच कृष्णेच्या काठावर समर्थांनी अकरा मारुती स्थापले आहेत.
आजमीतीला महाराष्ट्रातील अनेक गडकोटांवर, घाटवाटांवर, तटा बुरुजांवर, कडे कपारीत मारूतीराया नाना रुपात विराजमान आहेत.. मुळ दहा प्रकारात असलेल्या मारुतीरायांची रूपे अनोखी भासतात.. त्यातीलच बर्याच मंदिरात विराजीत असलले स्वरुप म्हणजे चपेटदान मारुती, मीश्र मारुती, दास मारुती आणि वीर मारुती..
१९८३ साली धामणसई गावात मीश्र मारूतीरायाची स्थापना कौलारू ढाचा असलेल्या मंदिरात ग्रामस्थांच्या मार्फत करण्यात आली.. शक्तीचे उपासक असलेल्या बजरंगबळींच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराला लगतच तरूणांसाठी व्यायामशाळेची व्यवस्था असायची..२०२४ साली कौलारू ढाचा जाऊन मंदिराला पक्क्या बांधकामचा साज चढलाय, परंतु मुळ जुण्या रूपातील मारूतीराया तेवढाच वीररसात न्हालेळा पहायला मिळतो..
मारुतीरायाचे हे मीश्र रुप खुपच कमी मंदिरात पहायला मिळते.. यामागची कथा अशी की- अशोकवनात सीतामाईंची भेट घेतल्यानंतर विंध्वस करणारा हनुमंत, असे चपेटदान मारुतीचे रुप असते..आपल्या शरीराचा आकार लहान मोठा करण्याची अनोखी विद्या ही हनुमंतरायांना अवगत होती.. याच विद्येच्या बळावर हनुमंतरायांनी अशोक वाटिका उदध्वस्त केली. त्यांच्या तडाख्याने अनेक वृक्ष उन्मळून पडू लागले..यात एक हात चापट मारण्याच्या आविर्भावात असतो तर शेपटी उजवीकडून वरील बाजूने मस्तकावरुन कमानी सारखी डावीकडे झुकलेली असते..हे स्वरूप क्रोधामयान अवस्थेचे प्रतिक असते. पायाखाली असलेले स्ञी शिल्प म्हणजे अशोकवाटिकेच्या संरक्षणासाठी नेमलेली स्ञी म्हणजे लंकेची राक्षसीण पनवती आहे..जीच्यावर हनुमंतरायांनी विजय मिळवला..
परंतु मंदिरातील मीश्र स्वरूपातील या मुर्तीत हनुमंतरायांचे दुसरे स्वरूप सुद्धा पहायला मिळते ते म्हणजे “प्रताप मारुती”.. वीराच्या भूमिकेत असलेला हा मारुती एका हातात गदा घेऊन वीर रसात न्हाळेला असतो, तर दुसर्या हातात द्रोणागिरी पर्वत पेळलेला असतो.. एखादे भिमकाय, महापराक्रमी, महाप्रतापी म्हणजेच प्रचंड मोठे कार्य करण्यासाठी हनुमंतांच्या ज्या रुपाची गरज लागते ते म्हणजे “प्रताप मारुती..”
चपेटदान मारूतीराया आणि प्रताप मारूतीराया या दोन प्रकारांचा उत्कृष्ट मिलाफ बनून मीश्र मारुतीरायाची ही मूर्ती धामणसई गावातील मंदिरात विराजमान आहे..मीश्र स्वरूपातील हनुमांताचे हे रुप फारच दुर्मिळ आहे…खुप कमी मंदिरात या मारूतीरायाचे हे रुप पहायला मिळते..
असा हा मीश्र स्वरूपातील मारूतीराया धामणसई गावचा पाठीराखा म्हणून पुजला जातो.. ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा अनोखा संगम चैञ पौर्णिमेला हनुमान जयंतीला मंदिरात पहायला मिळतो..
…विश्वास सानप, कोलाड
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.