धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे क्रिकेट स्पर्धेत गावदेवी बाहे संघ अंतिम विजेता

Bahe Sangha
कोलाड :
तालुक्यातील धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे आयोजित क्रिकेट सामन्यात गावदेवी बाहे संघ ठरला अंतिम विजेता.तर फेरीतील अंतिम सामना गावदेवी बाहे विरुद्ध यंग स्टार देवकान्हे यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर बाहे संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर यंग स्टार देवकान्हे संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक प्रणव इलेव्हन वैजनाथ हा संघ मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर बाहे संघाचा रोहित थिटे स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज देवकान्हे संघाचा स्वप्नील भोईर, तर उत्कृष्ट फलंदाज बाहे संघाचा ओमकार थिटे यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले .
देवकान्हेच्या प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे आयोजन रविवारी २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते तर स्पर्धेचे शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते तथा युवकांचे प्रेरणास्थान देविदास रघुनाथ भोईर ,किशोर सीताराम कान्हेकर,अविनाश ,जितेंद्र कान्हेकर, व अविनाश कान्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले.उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या सदरच्या धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे यांनी खांब विभागीय आयोजित केलेल्या स्पर्धेला व क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी मराठी उद्योजक तथा युवकांचे स्पुर्तीस्थान नारायण रामचंद्र कान्हेकर (सई गिफ्ट मालक) , नितीन मारुती भोईर, राजेश जाधव, सहदेव भोईर, विनोद सुटे, पत्रकार डॉ श्यामभाऊ लोखंडे,आदी मान्यवरांनी सदिच्छा दिल्या.
मोठया उत्साही वातावरणात खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा देवकान्हे मैदानावर रंगदार पार पडत रसिक प्रेक्षकांनी भरभरून आनंद लुटला. तर रसिक प्रेषकांना खेळातील अतिशय उत्सुकता लागलेल्या अंतिम फेरीतील सामना कोण जिंकणार याची तर अंतिम लढत ही होम ग्राऊंडवर देवकान्हे विरुद्ध बाहे असे झालेल्या संघात अखेर देवकान्हे संघाच्या होम ग्राऊंडवर देवकान्हे संघाचा पराभव करत बाहे संघाने बाजी मारत सामन्यातील अंतिम विजेतेपद पटकावले तर संपन्न झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ तसेच खेळाडूंचा सत्कार मराठी उद्योजक नारायण कान्हेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे मंडळाचे पदाधिकारी युवक व सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading