
कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) :
धनगर समाजाला एसटी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीविरोधात राज्यभरातील आदिवासी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
कर्जत तालुक्यातील आदिवासी समन्वय समितीने तहसीलदारांना निवेदन देत, धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश होऊ नये, अशी मागणी केली.
या वेळी आदिवासी समन्वय समिती कर्जत आदिवासी ठाकूर समाज ,आदिवासी महादेव कोळी समाज ,आदिवासी आदिम कातकरी समाजातील मान्यवर व तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
उच्च न्यायालयाने धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करता येणार नाही असा निकाल दिला असतानाही शासनाकडून परिपत्रक काढण्याची चर्चा आहे. यावर तीव्र विरोध होत असून, तसे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यास राज्यभरात आंदोलन, मोर्चे आणि उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.