धक्कादायक ! स्विमिंग पूलमध्ये बुडून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू; परिसरात हळहळ

Pintya1
सोगाव (अब्दुल सोगावकर) :
अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी संध्याकाळी दुर्दैवी घटना घडली, हद्दीतील झिराडपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्म हाऊस मधील स्विमिंग पूलमध्ये पडून चार वर्षाच्या मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 मांडवा सागरी पोलिसांकडून मिलालेल्या माहिती नुसार, झिराडपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरेंद्रकुमार अशोक दास (वय२८) मूळ रा. पंचायत भवन जवळ, रविदास टोला, सोसोकला जि. रामगड, राज्य झारखंड, हा केअर टेकर म्हणून आपली पत्नी निकीताकुमार व मुलगी अतिक्षा(वय ४) हिच्यासह कामानिमित्त बंगल्यात राहत होता, गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५:३०च्या सुमारास मुलगी अतिक्षा आपल्या वडिलांसोबत खेळत होती.
त्याचवेळी बंगल्यात पाण्याचा टँकर आल्याने मुलीला सोडून टँकर खाली करण्यासाठी गेले, थोड्या वेळाने आल्यानंतर त्यांनी पत्नीला मुलगी कुठे आहे ? असे विचारले, तेव्हा पत्नीने मुलगी तुमच्या सोबत गेली होती, असे सांगितले व ते बंगल्याच्या परिसरात मुलीला शोधु लागले असताना त्यांना मुलगी अतिक्षा स्विमिंग पुलच्या पाण्यात तरंगताना दिसली. त्यांनी वेळ दवडता लगेच मुलीला पाण्यातून बाहेर काढली असता मुलगी बेशुद्धावस्थेत होती.
त्या दोघा पती पत्नीने मुलीला घेऊन चोंढी येथील डॉ. आर. के. पाटील यांच्या रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून लगेच पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
याबाबतची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना समजताच त्यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून मुलीला त्वरित अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथील उपस्थित डॉक्टरांनी मुलीला तपासले असता ती मृत झाल्याचे सांगितले.
या घटनेबाबतची नोंद मांडवा सागरी पोलिसांनी घेतली असून अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अक्षय पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading