
नवी दिल्ली : RBIने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याची घोषणा केली आहे. २३ मेपासून नोटा बदलण्याचे काम सुरू होणार असून ३० सप्टेंबर शेवटची तारीख असणार आहे. या नोटा बदलण्यासंदर्भात SBIने महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयांच्या नोटा एकावेळी २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलण्याची सुविधा असेल, यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. यामुळे नागरिक एकाच वेळी २००० रुपयांच्या १० नोटा बदलून घेऊ शकतात.
तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन कोणताही फॉर्म न भरता किंवा ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा सहज बदलून घेऊ शकता.
बँकेने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयांच्या दहा नोटा बदलताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज भासणार नाही. म्हणजेच, नोटा बदलून घेताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.
रिझर्व्ह बँकेची २००० रुपयांच्या नोटांसंदर्भात घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात घोषणा केली. पण या नोटा रद्द केल्यानंतरही त्या लीगल टेंडर असतील, असे आरबीआयने म्हटले. आता २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिक २००० रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात.