नागोठणे :
रायगड जिल्हा नाभिक समाज संघाची सोमवार 14 ऑक्टोबर रोजी रोहा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे, सचिव महेंद्र माने, उपाध्यक्ष प्रमोद जाधव, खजिनदार योगेश शिर्के, सहसचिव संतोष पवार, कार्याध्यक्ष सोपान मोहिते, संतोष जाधव,शेखर घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन डिसेंबर रोजी जिल्हाध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यात येणार असल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा सचिव महेंद्र माने यांनी दिली.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या बैठकीच्या सुरुवातीला माजी जिल्हाध्यक्ष जनार्दन मोरे व समाजातील मरण पावलेल्या ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आला. तसेच जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे व त्यांच्या कार्यकारणीला तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नविन कार्यकारणीची निवडी संदर्भात विचार विनिमय करण्यात आला.
यामध्ये निवडणूक निपक्ष व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे,विश्वस्त भाई टके, अनिल पवार व अशोक खंडागळे यांच्यासह संतोष जाधव,शेखर घाडगे,महेंद्र माने,महेंद्र मोरे,जयंत शिंदे,अजित हुजरे,जयेश जाधव आदी अकरा मान्यवरांची एक जिल्हाध्यक्ष निवड कमिटी नेमण्यात आली. त्यामध्ये निवडणूक न घेता नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष निवड ही दोन डिसेंबर रोजी सर्वांच्या सहमतीने बिनविरोध करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपल्या तालुकाध्यक्षांचे शिफारस पत्र आणणे बंधनकारक तसेच तो सर्व विभाग,तालुका व जिल्ह्यात समाज कार्यात सहक्रिय असणे गरजेचे आहे.
आलेल्या शिफारस पत्रातून निवड कमिटी जो निर्णय (जिल्हाध्यक्षबाबत) देतील त्या निर्णयाला सर्व समाज बांधव एकमताने मान्यता देणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सचिव महेंद्र माने यांनी दिली. आयत्या वेळच्या विषयात समाज कार्य,इतर विविध समस्यां तसेच पुढील वाटचाली बाबत चर्चा विनिमय करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
दरम्यान या बैठकीचे नियोजन व उत्कृष्ट व्यवस्था रोहा शहर कमिटीच्या वतीने करण्यात आली होती. उपस्थितांचे आभार संतोष पवार यांनी मानले.या बैठकीला विजय साळुंखे, शामकांत नेरपगार, प्रविण खराडे, शैलेश रावकर,प्रविण पवार,अजित हुजरे, महेंद्र मोरे, राजेश खराडे, दिगंबर खराडे, रविंद्र टके, सुधाकर निंबाळकर, संजय सकपाळ, नरेश मोहिते, किरण मोहिते, महेश मोहिते, सचिन दिवेकर, जयंत शिंदे, राहुल कडव, किशोर खंडागळे, प्रेम खराडे, रुपेश साळुंखे, राकेश सकपाळ, दिलीप कदम, दिपक दिवेकर, राजु दिवेकर, रमेश खराडे, महेंद्र जाधव, कांता हुजरे आदीसह पदाधिकारी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.