दोघिंसोबत लग्न,तीसरी सोबत लग्नाची सुपारी फोडली आणि चौथी सोबत लग्नाची बोलणी सुरू असताना नेरळ महिला पोलिस अधिकारी यांनी ठगाच्या मुसक्या आवळल्या

Yogesh Humane
कर्जत ( गणेश पवार ) : 
आधी दोघिंसोबत लग्न मग तीसरीच्या सोबत लग्न गाठ बांधण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पाडला आणि चौथी सोबत संसार थाटण्यासाठी बोलणी सुरू असतानाच आरोपी तरुणास नेरळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ३३ वर्षीय योगेश यशवंत हुमने असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील राहाणार आहे.
आरोपी योगेश ने आतापर्यंत अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यामध्ये एक महिला पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. दरम्यान योगेश विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच नेरळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरीक्षक प्राची पांगे या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकाऱ्याने आरोपीच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणत फसवणूक होत असतानाच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कोल्ह्यारे ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले येथील राहणारी ३४ वर्षीय पीडित विवाहित महिलेने आपल्याच पती विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महिलेने पतिविरोधत मानसिक छळवणूक आणि आर्थिक फसवणूक तसेच पतीचे या आधी लग्न झाले असताना, माझी फसवणूक करून माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
यामधे १५ ते २० लाखाची आर्थिक फसवणुक केल्याचे पीडित महिले कडून सांगण्यात आले होते. याबाबत तक्रारदार महिलेच्या सांगण्यावरून पती योगेश यंशवत हुंमने या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३६/२०२४ प्रमाणे विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर सदर गुन्हाचा अधिकचा तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या करीत होत्या.
दरम्यान महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यात एक निर्भय महिला लेडी म्हणून पाहिले जाणारे पोलीस अधिकारी प्राची पांगे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहकार्याच्या मदतीने आरोपी योगेश यंशवत हुंमने याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. यासाठी पोलिसांनी एक सापळा रचला होता. योगेश याने कार खरेदी केली होती ती कार पत्नीच्या नावे होती. त्यामुळे आपल्या नावावर कार करायची असल्याने पत्नीला भेटायला आलेल्या योगेशच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 
३३ वर्षीय ठग योगेश हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे येथील राहणारा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी खाकी दाखवताच योगेशचे काळे कारनामे बाहेर आले आहे. आरोपी योगेश याने आजवर अनेक अविवाहित मुलींची फसवणूक केलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून त्या महिलेला किंवा मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केलेली असल्याचे उघड झाले आहे. विवाहित असलेला आरोपी योगेश याने आजवर अविवाहित असल्याचे भासवून पीडितांना लुटले आहे. दोन मुलींची लग्न करून तिसऱ्या मुलीच्या सोबत लग्न करण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम देखील त्याने पार पाडला आहे. त्यातच चौथ्या मुलीसोबत संसार थाटण्यासाठी मुलीच्या घरच्यांशी बोलणे देखील सुरू असल्याचा प्रकर पोलिस तपासात समोर आला आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे फसवणूक झालेल्या महिलांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल महिलेचा देखील समावेश आहे. ज्यांचे लग्न जुळत नाही किंवा ज्यांचे वय आधिक झाले आहे अशा महिलांसोबत ओळख निर्माण करून त्यांच्याशी लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम हा आरोपी करीत होता. आरोपी योगेश याने लग्न केलेल्या एका महिलेला मुलगी देखील जन्माला आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांनी नेरळ येथील पीडित महिलेच्या तक्रारी नंतर दाखवलेली कार्यतत्परता यामुळे येणाऱ्या पुढील काळात कित्येक महिला तरुणींचे जीवन आणि संसार उजाड होण्यापसून रोखले आहे.
एकूणच नेरळ पोलीस विभागाकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडिया वरून होणाऱ्या फसवणुकी बाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून कुठल्याही अमिषाला बळी पडू नये म्हणून संगण्यात येत आहे. दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरिक्षक तथा कार्यतत्पर अधिकारी प्राची पांगे यांच्या कामाचे आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांचे सर्वस्तरातून विशेष कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading