
मुंबई ( शांताराम गुडेकर ) :
समाजातील दुर्बल, दुर्लक्षित आणि समाजाच्या प्रबोधनासाठी लेखणी चालविणारे सर्वांचे जवळचे मित्र ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक (मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे मा. कोषाध्यक्ष), ज्येष्ठ पत्रकार (महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी) नितीन शांताराम चव्हाण (वय ५३ वर्षे) यांची आज मंगळवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी, पहाटे ०३:३० वा. प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (१ ऑक्टोबर रोजी) दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णालयातून घरी आणण्यात येणार आहे. ( सध्या त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालयात ठेवले आहे.) त्यानंतर विक्रोळी (पूर्व) टागोरनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नितीन चव्हाण दीर्घ आजारातून बरे व्हावेत यासाठी आपण सर्व पत्रकारांनी, दानशूर व्यक्ती, महापालिकेचे काही अधिकारी वर्ग, मित्र परिवार आदींनी आपल्याकडून शक्य होईल त्या सर्व प्रकारे प्रयत्न केले.मात्र ते प्रयत्न नियतीसमोर अपुरे पडले. अनेकांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून दुःख व्यक्त केले.