देहेन गावचे वै.ह.भ.प. विद्याधर महाराज निळकर यांचा प्रवेशद्वार सोहळा मोठ्या दिमाखात साजरा

Nilkar Maharaj Dehen
भाकरवड (जीवन पाटील) : 
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत देहेन गावचे वैकुंठवासी रायगड भूषण पुरस्कार प्राप्त ह .भ. प. विद्याधर महाराज निळकर यांच्या निधनानंतर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती त्यांनी केलेल्या अखंड वारकरी संप्रदायाचा सामाजिक, अध्यात्मिक कार्याचा ठसा संपूर्ण संपूर्ण रायगड जिल्ह्यात कायम राहिला असून त्यांच्या प्रति असणारे प्रेम, आदर भाव संपूर्ण देहेन गावातील ग्रामस्थानी, तरुण होतकरू मुलांनी एकत्र येत लोकवर्गणीतून एक सामाजिक बाधिलकी जपत त्यांच्या नावाची गावच्या वेशीवर सुंदर अशी कमान तयार करण्यात आली आहे आणि त्या कमानिला वैकुंठ वाशी ह भ प विद्याधर महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. याचा नामकरण सोहळा सोमवार दि.3 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता साजरा झाला.
यावेळी प्रथम ह भ प विद्याधर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार दीपप्रज्वलन करून नामकरण सोहळा,त्यानंतर उपास्थित मान्यवरांचे मनोगत, सामुदायिक हरिपाठ, ह भ प अमित महाराज बळवली पेण यांचे कीर्तन रुपी सेवा, त्यानंतर उपस्थित सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

Nilkar Maharaj Dehen1

देहेन गाव म्हणजे संत महंतांचे गाव म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि याच गावातील अध्यात्मिक कार्याचा ठसा उमटवून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे स्वर्गीय नारायण बाबा गडबकर , नारायणा बाबा निळकर यांचे पट्ट शिष्य होते.
यावेळी कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यांचे परममित्र गोविंद शेलार , ह भ प जगन्नाथ महाराज, नंदाई नंदेश्वरी , मुलगा ज्ञानेश्वर , सोपान आदींनी ह भ प विद्याधर महाराज यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या देहेन गावातील सर्व ग्रामस्थ , तरुण मित्र यांना धन्यवाद दिले मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि तुम्ही केलेल्या माझ्या बाबांच्या प्रवेशद्वार बद्दल आणि दाखवलेल्या प्रेमा प्रति मी अखंड तुमचा ऋणी राहीन असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थानी तरुण होतकरू मुलांना महिलांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading