जवळच असलेल्या वरवठणे सारख्या छोट्याशा गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील किरण नथुराम पाटील हे 17 वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेतून निवृत्त झाल्याने त्यांचे नागोठणे नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी मोदी सरकार आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अनुग्राहय बदल होऊन आम्हा सैनिकांना दिलेल्या अधिकारामुळे आम्ही तेथे छाती पुढे काढून अभिमानाने उभे राहण्याचे धाडस करत असल्याचे निवृत्त सैनिक किरण पाटील यांनी सांगितले.
लहानपणापासून देशसेवेचं स्वप्न बघत आपण काही तरी वेगळे करून आपल्या आई वडिलांची मान उंच राहील असे कार्य करण्याची प्रबळ इच्छा असलेले किरण पाटील हे भारतीय सैन्य दलात 2008 साली भरती होऊन 17 वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेत हवालदार पदावरुन निवृत्त झाले. निवृत्ती नंतर ते आपल्या गावी येत असता त्यांचे नागोठणे नगरीत वरवठणे व विभागातील नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत केले.
यावेळी किरण पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार आरपण करून अभिवादन करुण मिरवणुकीत सहभागी झाले. छ. शिवाजी महाराज चौकातून वाजत गाजत “भारत माता की जय,” “वंदे मातरम्” घोषणा देत किरण पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करीत निघालेली मिरवणूक वरवठणे गावात आल्यानंतर किरण पाटील यांनी जनसेवा करताना आलेले अनुभवात आपल्यावर ओढवलेल्या अनेक खडतर प्रसंगाची आठवण करून देत 2020 मध्ये जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत आपले सहा सहकारी सोडून गेल्याची कटू आठवण सांगून आज मोदी सरकार आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अनेक अनुग्राहय बदल होत गेले. त्यामध्ये आम्हा सैनिकांना काही दिलेल्या अधिकारामुळे आम्ही तेथे छाती पुढे काढून अभिमानाने उभे राहण्याचे धाडस करत असल्याचे सांगून त्याबद्दल मोदी सरकारला धन्यवाद असल्याचे शेवटी पाटील यांनी सांगितले.
या स्वागत मिरवणूकीत वरवठणे सरपंच ऋतुजा म्हात्रे,किशोर म्हात्रे, गणपत म्हात्रे, नथुराम पाटील,मारूती राणे, पांडुरंग म्हात्रे, दत्ताराम करजेकर, यशवंत करजेकर, अनंता करजेकर, ॲड. किरण करजेकर, हरिश्चंद्र म्हात्रे, प्रकाश पाटील, प्रकाश करजेकर, मारुती पाटील, रविंद्र म्हात्रे, द्वारकानाथ भोय, राकेश म्हात्रे, तुकाराम भोय, रोशन पाटील, रमेश म्हात्रे, होनाजी पाटील, निलेश पाटील यांच्यासह वरवठणे गावासह विभागातील महिलांसह नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.