देवाने दिलेला देहरूपी चंदन याचा कोळसा करू देऊ नका : ह.भ.प.विकास महाराज देवडे

Vikas Maharaj
कोलाड (श्याम लोखंडे) :
देवाने दिलेला देहरुपी चंदन, त्या देहाचा कोळसा करुन देऊ नका असे मत वैजनाथ येथील विठ्ठल रखुमाई मूर्ती स्थापनेचा २९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित किर्तन सेवेत ह.भ.प विकास महाराज देवडे अहमदनगर यांनी व्यक्त केले.

रोहा तालुक्यातील वैजनाथ येथे २९ विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना वर्धापन दिनी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना देवडे महाराज बोलत होते. प्रसंगी सांगतो तुम्हांसी भजा रे विठ्ठला l नाही तरी गेला जन्म वाया ll१ll करिता भरोवरी दुरावसी दुरी l भवाचिया पुरी वाहावसी ll२ll कांही न लगो एक भावची कारण ll तुका म्हणे आण विठ्ठलाची ll या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभांगाच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प.विकास महाराज देवडे यांनी सांगितले की एका प्रांताचा राजा शिकारीसाठी जंगलात गेला त्यांनी एका प्राण्याची शिकार करण्यासाठी धनुष्याला बाण लावणार तेव्हा राजाचा पाय चुकून एका विषारी सापावर पडणार एवढ्यात एका लाकडाची मोळी विकणाऱ्यांनी पहिले त्यांनी राजाला ढकलून दिले आणि राजाचे प्राण वाचवले त्यामुळे राजांनी त्याला सांगितले की तू काय काम करतोस त्यावर लाकडे तोडून त्यांचा कोळसा करून मी तो कोळसा विकतो त्यांच्यावर माझा संसार आहे असे त्या मोळी विकणाऱ्यांनी राजाला सांगितले.

राजानी त्या मोळी विकणाऱ्याला राजवाडयात नेऊन प्रधानजीला त्याला पाच एकर चंदनाची जमीन बक्षीस देण्यास सांगितले. दोन वर्षांनी राजा फेरफटका मारण्यासाठी त्याबाजूने निघाला असता तो पाच एकरचा चंदनाचा परिसर जळून खाक झाला होता ते राजांनी पाहिले राजा रथामधून खाली उतरला तो परिसर बघत असतांना त्या मोळी विकणाऱ्यांनी राजाला पहिले तो राजाकडे धावत आला आणि राजाला नमस्कार केला राजाने विचारले तुझे कसे चालले आहे. मोळी विकणाऱ्यानी सांगितले की, तुम्ही दिलेली पाच एकरची झाडे जाळून त्याचा कोळसाकडून मी विकतो राजाला राग आला त्यांनी मोळी विकणाऱ्याला सांगितले की मला एक काठी आणुन दे मोळी विकणाऱ्याकडे फक्त कुऱ्हाडी दांडा होता. राजाला त्यांनी तो दांडा राजाला दिला राजाला त्याला मारायचा होता परंतु त्याला न मारता राजाने सांगितले की चंदन विक्रेत्याकडे जाऊन या काठीचे किती रुपये येतील हे बघून ये चंदन विक्रेत्याने या काठीचे दहा हजार रुपये येथील असे सांगितले मोळी वाल्याने १५ कोटीची मालमत्ता जाळून फक्त पाच हजार रुपये मिळाले नंतर मोळी विकणाऱ्याच्या ही चूक लक्षात आली तो पर्यंत वेळ निघून घेली होती. यामुळे प्रत्येकाने विठ्ठचे भजन नित्यनेमाने करावे अन्यथा चंदनरुपी देहाचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी दत्तू महाराज कोल्हाटकर, मारुती महाराज कोल्हाटकर,भाऊ महाराज दळवी,गायनाचार्य रवि महाराज मरवडे, रोहिदास महाराज दळवी,भुषण महाराज वरखले,नरेश दळवी, किरण ठाकूर,देवजी मरवडे,मृदूंग मणी संजय म्हसकर,ज्ञानेश्वर दळवी, प्रेम चव्हाण,तळवली सरपंच रविंद्र मरवडे, नारायण लोखंडे,अविनाश भोसले तसेच रोहा तालुक्यातील असंख्य वारकरी उपस्थित होते. सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी वैजनाथ ग्रामस्थ, महिला वर्ग, नवतरुण मंडळ यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading