महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये वीरगळांचे महत्व वैशिष्टय़पूर्ण समजले जाते. वेगवेगळ्या राजवटींमध्ये सत्तासंघर्षातून बलिदान दिलेल्या वीरांचे वीरगळ महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. उत्तर कोकणचे शिलाहार घराणे आणि यादवांमधील संघर्षातील वीरांची स्मारके माणगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दृष्टीस पडतात.
रातवड हे माणगाव तालुक्यातील उत्तरेकडील शेवटचे गाव याच गावात वैविध्यपूर्ण वीरगळ महामार्गालगत अनेक वर्षांपासून उध्वस्त अवस्थेत होत्या. माणगड , सूरगड येथे गडसंवर्धन करणार्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या वीरगळांचे संवर्धन करण्याचे ठरवले. आणि मग ध्यासाने झपाटलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेने रातवड ग्रामस्थांच्या संमतीने , छानसा जांभा दगडांमधील चौथरा आणि त्यावर टिकाऊ आकर्षक छप्पर बनले गेले.
रविवार दि. 1 सप्टेंबर 2024 यादिवशी दुर्गवीर प्रतिष्ठान आणि सोबतीला आम्ही सह्याद्रीचे शिलेदारांची साथ मिळाली. आधी बांधलेल्या चौथर्यावर सर्व वीरगळ व्यवस्थित ठेवल्या . उपस्थित दुर्गवीर, शिलेदार , शिवशंभू प्रतिष्ठान चे मावळे आणि त्याच वेळी अचानक उपस्थित राहिलेले हायवेचे अधिकारी यांना वीरगळांबद्दल माहिती आणि स्मारक बांधण्याचे प्रयोजन दुर्गवीर प्रतिष्ठान सल्लागार रामजी कदम आणि राजधानीरायगड अभ्यासक मोहनराव फराडे यांनी सांगितले.
वीरगळ संवर्धन मोहिमेत दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य विठ्ठल केंबळे, प्रमोद डोंगरे , महेंद्र पार्टे , किशोर सावरकर, अजित लाखाडे , सुयोग पाटील, कल्पेश सागवेकर, संकेत गोरिवले , श्रेया मालांडकर , आम्ही सह्याद्रीचे शिलेदार संस्थेचे प्रफुल्ल करकरे , सिध्दांत शिंदे ,प्रतीक भोनकर रातवडचे ग्रामस्थ आणि उपसरपंच सतीश पवार, प्रणित कदम, किरण गायकर तसेच शिवशंभू प्रतिष्ठान रोहाचे प्रशांत बर्डे आणि सहकारी उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.