खारघर उपनगरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका दिवसात दुचाकी चोरीचे तीन गुन्हे खारघर पोलीस ठाण्यात नोंदवले गेले आहेत. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
सिडको मंडळाने खारघर उपनगरासह सर्वच उपनगरांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आणि इतर चोर्या रोखण्यासाठी मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. मात्र तरीही चोरटे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
खारघर येथील सेक्टर 15 मधील कुंजविहार सोसायटीमध्ये राहणार्या महिलेने त्यांची दुचाकी चार दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजता दीपशाईन सराफ दुकानासमोरील रस्त्याच्या समोर उभी केली होती. 10 मिनिटात संबंधित महिला दुचाकी घेण्यासाठी आल्यावर त्यांना ती सापडली नाही.
तसेच दुसर्या घटनेत सेक्टर 34 येथील लक्ष्मी पॅराडाईज या सोसायटीत राहणार्या 29 वर्षीय तरुणाने त्याची दुचाकी सकाळी साडेदहा वाजता खारघर रेल्वे स्थानकालगतच्या खववशेजारील मोकळ्या जागेत उभी केली होती. रात्री साडेअकरा वाजता केली होती आल्यावर त्याला दुचाकी सापडली नाही.
तिसर्या घटनेत सेक्टर 11 येथील केंद्रीयविहार सोसायटीत राहणार्या 27 वर्षीय तरुणाने सकाळी अकरा वाजता खारघर रेल्वे स्थानकाजवळील अंबिका हाइट्स या इमारतीसमोरील पदपथावर दुचाकी उभी केली होती. रात्री साडेनऊ वाजता ती दुचाकी तेथे नव्हती.
खारघर आणि खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानके वाहन चोरट्यांची लक्ष्य ठरत आहेत. वाहनमालकांनी बेभरवशावर वाहने उभी केल्याने चोरट्यांचे फावत आहे. याचा लाभ चोरट्यांना होत असून शेकडो वाहने या परिसरातून चोरी झाली आहेत. वाढत्या वाहनचार्या रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वतंत्र उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.