पनवेल शहरातील उरण नाका, कोळेश्वर चौक येथे असलेल्या पुजारा टेलिकॉम दुकानात घरफोडी करून लाखो रुपये किंमतीचे जवळपास 55 मोबाईल चोरुन नेणार्या एका तरुणास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने अटक केेली असून त्याच्याकडून आतापर्यंत 41 मोबाईल ज्याची किंमत 19 लाख 22 हजार 771 रुपये इतकी आहे. ते हस्तगत केले आहेत.
पुजारा टेलीकॉम शॉपचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने शटरचे कडी कोयंडा कापुन दुकानामधील विकीस ठेवलेले नवीन पेटीपॅक व जुने असे 23,95,163/- रूपये किंमतीचे एकुण 55 मोबाईल फोन घरफोडी चोरी करून नेल्याने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पनवेल शहर पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे पथक समांतर आरोपीचा शोध घेत असताना कक्ष कार्यालयाकडील पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आरोपी येण्याजाण्याचे मार्गावरील सीसीटिव्ही. कॅमे-यांचे फुटेजची पाहणी केली असता गुन्हयातील आरोपी घटनेच्या रात्री मोटर सायकलवरून घटनास्थळ परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. सदर इसमाची ओळख पटविली असता सदरचा गुन्हा आकाश वळकुंडे याने केल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हयाचा तांत्रिक तपास व गोपनिय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त करत असताना सदर गुन्हयातील आरोपी आकाश राजाराम वळकुंडे, वय 20 वर्षे, व्य. शिक्षण, राहणार – प्रदिप म्हात्रे यांचे चाळीत, घर नंबर 162, मु.पो. पुंडे, ता. उरण, जि. रायगड, मुळ राहणार – मु.पो. घेरडी, ता. सांगोळा, जि. सोलापुर हा नमुद गुन्हयातील चोरीचे मोबाईल फोन विक्री करण्यासाठी सीबीडी. बेलापुर रेल्वे स्थानक पार्किंग परिसरात आला असताना त्यास ताब्यात घेतले.
आकाश वळकुंडे यास विश्वासात घेवून केलेल्या गुन्हयाचे तपासा दरम्यान त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईल फोन पैकी 19,22,771/- रूपये किंमतीचे एकुण 41 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. मा.वरिष्ठांचे आदेशाने आकाश वळकुंठे यास गुन्हयाचे पुढिल तपासकामी पनवेल शहर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध पोलीस आयुकत, नवी मुंबई मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमित काळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सपोआ, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे यांचे पर्यवेक्षणाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 नेमणूकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गवळी, सपोनि प्रविण फडतरे, अजित कानगुडे, पोउपनि प्रताप देसाई, मानसिंग पाटील, माधव इंगळे, अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, निलेश पाटील, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, सागर रसाळ, दिपक डोंगरे, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई लवंकुश शिंगाडे, विकांत माळी यांनी केली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.