दिव्यांग अध्यक्षपदाचा बच्चू कडू यांचा राजीनामा; बांधवांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार

Bachhu Kadu
मुंबई ( मिलिंद माने ) :
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले व तत्कालीन राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे सादर केला आहे.
सन २०२४ च्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर माजी आमदार आमदार बच्चू कडू यांनी विद्यमान सरकार वर टीकास्त्र केले होते तसेच अमरावती जिल्ह्यातील नवनीत राणा व रवी राणा कुटुंबांच्या वादामुळे बच्चू कडू चर्चेत आले होते त्यातच विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे ते महायुती सरकारमध्ये नाराज झाले होते अखेर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री कार्यालय सादर केला.
दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदी असलेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामाचे लेखी पत्र सादर करताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे दिव्यांग मंत्रालय निर्माण केल्याबद्दल आभार मानले असून त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे.
तसेच मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये पाठ टक्के निधी दिव्यांगासाठी खर्च करत नाही त्याचबरोबर अजूनही स्वतंत्र मंत्री दिव्यांग साठी नेमण्यात आलेला नाही व सचिव देखील नाही असे स्पष्ट करून जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय देखील निर्माण करण्यात आले नाही व त्याची पदभरती देखील करण्यात आले नाही.
दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदी असलेले माजी आमदार बच्चू कडू यांनी इतर अनेक गोष्टी ज्या झाल्या नाहीत या पदावर राहून ते होणार नाही अशी शक्यता मावळलेली आहे म्हणून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलन करावी लागणार व पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही दिव्यांग सोबत बीएम आणि कदापि शक्य नाही म्हणून मी माझ्या राजीनामा देत आहे तो मंजूर करून सहकार्य करावे तसेच मला सुरक्षा सुद्धा काढून टाकावे कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये अशी स्पष्टपणे नाराजी त्यांनी आपल्या पत्राद्वारे दिलेल्या निवेदनात सादर केल्याने पुन्हा एकदा बच्चू कडू दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरण्यास सज्ज झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading