दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वाटप

Handucap Cycle Distibute
कर्जत ग्रामीण (मोतीराम पादीर) : 
 बुधवार दि.२६ मार्च रोजी रा.स्व.संघ जनकल्याण समिती व  भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि.मुंबई रिफायनरिच्या सी. एस.आर.योजने अंतर्गत दिव्यांगाना सहाय्यक उपकरणे वाटप कार्यक्रम पनवेल महानगर पालिका मा.आयुक्त मंगेश चितळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात  मंगेश चितळे व प्रकल्प  समिती पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते भारत माता प्रतिमेचे पुजान व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख आतिथी आयुक्त मंगेश चितळे यांचा सत्कार संस्था अध्यक्षा डाॅ.किर्ती समुद्र यांनी केला.व्यासपीठावरील पाहुण्यांचा सत्कार संस्था कार्यवाह राजीव समेळ यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटेश लामजने यांनी केले.
मंगेश चितळे यांनी रुग्णालय  करत असलेल्या कामांचे कौतूक केले. दिव्यांगांसाठी असणाऱ्या सरकारी योजना दिव्यांगां पर्यंत पोहचत नाहित तसेच असे बरेच दिव्यांग  आहेत ज्यांची नोंदणी होत नाही.काहीजण अंथरूणावर आहेत त्यांना दिव्यांग  योजनेचा फायदा मिळत नाही.पनवेल महानगर पालिका यावर काम करत आहे.रा.स्व.संघ जनकल्याण समिती व पनवेल महानगर  पालिका मिळून यासाठी चागले काम करु शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या नंतर रुग्णालयची माहिती प्रकल्प अध्यक्षा डाॅ.किर्ती समुद्र यांनी करुन दिली.
महाराष्ट्रात चालणाऱ्या जनकल्याण समितीच्या प्रकल्पांची माहिती प्रमोद क्षिरसागर यांनी करुन दिली. विठ्ठल गाडेकर यांनी दिव्यागांसाठी महाराष्ट्रात प्रथमच सुरु झालेल्या लातूर येथिल आय. टी.आय ची माहिती दिली.सदर प्रशिक्षण हे मोफत असून वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. या संधिचा लाभ दिव्यांगांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास संस्था अध्यक्षा डाॅ.किर्ती समुद्र, उपाध्यक्ष डाॅ.ययाती गांधी,कार्यवाह राजीव समेळ,सह कार्यवाहीका सौ.अनुराधा ओगले,रा.स्व. संघ जनकल्याण समिती प्रांत सदस्य.प्रमोदजी क्षीरसागर रा.स्व. संघ कोकण प्रांत सह कार्यवाह शरदजी ओगले,रा.स्व.संघ कुलाबा जिल्हा कार्यवाह श्रीरंगजी काणे,रुग्णालय मुख्य संचालक व्यवस्थापक सुनीलजी लघाटे,रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डाॅ.भक्ती सारंग तसेच दिव्यांग व रुग्णालय सेवक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन.प्रसन्न खेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजीव समेळ यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading