श्रीवर्धन तालुक्यातील अदानी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून महिला दिना निमित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला दिवेआगर चे प्रथम नागरिक सिद्धेश कोस्बे, श्रीवर्धन पोलिस उप अधिक्षक सविता गर्जे यांच्या प्रमुख उपस्थित माळी समाज महिला अध्यक्ष स्नेहल केळसकर,शितल तोडणकर माजी गट शिक्षणाधिकारी श्रीवर्धन,बचत गट प्रमुख प्राजक्त भगत, बोर्ली पंचतन माजी सरपंच ज्योती परकर, दिघी पोर्ट लिमिटेडचे चंदर देव सॅनब्याल, गोपाल अहिरकर,संग्राम सिंह शेखावत,जनता शिक्षा संस्था संचालक उदय बापट, अदानी फाऊंडेशनच्या जयश्री काळे आणि अवधूत पाटील उपस्थित होते. माळी समाज महिला अध्यक्ष स्नेहल केळसकर,सौ.शितल तोडणकर माजी गट शिक्षणाधिकारी श्रीवर्धन, बचत गट प्रमुख प्राजक्ता अडुळकर
सरपंच सिद्धेश कोसबे यांनी जागतिक महिला दिना निमित्त शुभेच्छा देत महिलांच्या विकासासाठी सदैव तत्पर कसे राहता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले. शितल तोडणकर यांनी मॅरेथॉन सामन्यात भाग घेण्यासाठी महिलांना विशेष प्रोत्साहित केले.lमहिला या कुटुंबासाठी कशा प्रकारे पाठीचा कणा असल्याचे महत्त्व पटवून दिले. तर महिला म्हणजे संपूर्ण जग, आणि महिला म्हणजेच जागर तुमच्या आमच्या माय लेकींचा , जागर स्त्री जातीचा, आणि विधात्याच्या नव निर्माणाच्या कला कृतीचा. एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा असे उद्गार अदाणी फाऊंडेशन च्या जयश्री काळे यांनी काढले.
यावेळी गोपाळ अहिरकर,अभियांत्रिकी प्रमुख,दिघी पोर्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या माता जिजाबाई यांनी कशा प्रकारे शिवाजी महाराजांना संस्कार दिले,अगदी तसेच संस्कार प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना देण्यात यायला पाहिजे असे बोलले. संभाजी महाराज यांनी रयतेची सेवा कशा प्रकारे घडवून आणली आणि यात त्यांच्या आईची भूमिका यावर त्यांनी मत मांडले.दिवेआगर बीच येथे मॅरेथॉनचे उद्घाटन पोलिस उप अधीक्षक सविता गर्जे यांनी झेंडा फडकवत केले. दिवेआगर आणि बोर्ली पंचतन येथील १२२ महिला व मुलींनी सहभाग घेतला होता.
विजेत्या स्पर्धकांना ३ टप्यात १६ ते,२१, २२ते ४० आणि ४० वयोमर्दा वरीलं सर्व महिला यांचा सहभाग नोंदवण्यात आला.यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे बक्षीस वितरण करण्यात आले. ट्रॉफी तसेच मेडल देऊन गौरविन्यात करण्यात आले. मॅरेथॉन मध्ये परीक्षणाची महत्त्वाची भूमिका वडवली शाळेचे शेखर बोरकर, मनेरी नामावली शाळेचे मुख्याध्यापक परशुराम बिऱ्हाडी यांनी बजावली.अदानी फाऊंडेशन चे अवधूत पाटील, प्राजक्ता अडुळकर, नम्रता दिघीकर,अरुंधती पिळणकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.