यंदा दिवाळीच्या तारखेवरून गोंधळ निर्माण झाला आहे, कारण अमावस्या तिथी 31 ऑक्टोबरपासून 1 नोव्हेंबरपर्यंत दोन दिवस प्रदोष काळात आल्याने महाराष्ट्र आणि उत्तर भारतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मतभेद झाले आहेत. पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यावर मार्गदर्शन दिले आहे.
अमावस्या व प्रदोष काळ
आश्विनी महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार, यंदा अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:12 पासून सुरू होऊन 1 नोव्हेंबर संध्याकाळी 5:53 पर्यंत राहील. या तिथीच्या अंतर्गत प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते.
लक्ष्मीपूजन कधी करायचे?
उत्तर भारतात लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबरला साजरे होणार असले तरी महाराष्ट्रातील मराठी लोकांनी 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करावे, असे सांगण्यात आले आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त 1 नोव्हेंबर संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंतचा आहे. प्रदोष काळात 5:35 ते रात्री 8:06 पर्यंत लक्ष्मीपूजन करता येईल.
लक्ष्मीपूजन विधी आणि साहित्य
लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्यामध्ये लक्ष्मी व गणपतीचे फोटो, कुबेराची प्रतिमा, दागिने, तांदूळ, हळद-कुंकू, पंचामृत, फुले, लाह्या बताशे, नवीन झाडू इत्यादी समाविष्ट आहे. लाल कापडावर लक्ष्मी मूर्तीच्या स्थापना करून विधिवत पूजा करावी.
कलशामध्ये गंगाजल, आंब्याचे डहाळे आणि नारळ ठेवून लक्ष्मीची पूजा करावी. पूजा करताना ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्राचा उच्चार करावा आणि नैवेद्य दाखवून आरती करावी.
लक्ष्मीपूजनावेळी पाळावयाचे नियम
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील सर्व दिवे आणि खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत उघडे ठेवावेत. आर्थिक व्यवहार टाळावेत, अखंड ज्योत तेवत ठेवावी आणि लक्ष्मी देवीला लाह्या, करंजी, लाडू अशा पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
लक्ष्मीपूजनाची परंपरा आणि घरात समृद्धीची अपेक्षा
लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य घटक आहे. योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते, असे मानले जाते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.