कर्जत ( गणेश पवार ) :
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुधाकर घारे हे विधानसभा निवडणूक लढवणार हे जाहीर होत. मात्र ते नक्की कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार हा तिढा काही सुटत नव्हता. त्यामुळे कर्जत मतदारसंघात वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र अशातच आज पत्रकार परिषदेत घेत सुधाकर घारे यांनी दिवाळीआधीच मोठा राजकीय स्फोट केला आहे. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा घारे यांच्यासह संपूर्ण कर्जत खालापूर मधील कार्यकर्त्यांनी सरसकट राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता सुधाकर घारे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
कर्जत मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपासून विधानसभेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. महाविकस आघाडी जरी शांत दिसत असली तरी अंतर्गत संघर्ष सुरूच आहे. अशात महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुकांची गर्दी दाटली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुधाकर घारे यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली होती.
विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे देखील पुन्हा एकदा विधानसभेसाठी तयारी केली होती. अशात महायुतीचे तिकीट आपल्याच मिळणार असं दोघेही ठणकावून सांगत होते. त्यातच भाजपमधून किरण ठाकरे यांनी देखील विधानसभेसाठी दावेदारी केली होती. विधानसभेचे बिगुल वाजले तरी कोणाचीही अधिकृत उमेदवारी महायुतीने जाहीर केली नाही.