दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, ‘आप’ला मोठा धक्का!

Bjp Zenda
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवत 27 वर्षांनी राजधानीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. आम आदमी पक्षानं तब्बल 10 वर्षांनंतर सत्ता गमावली असून, पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा पराभव झाल्याने ‘आप’साठी हा धक्का ठरला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया देखील पराभूत झाले.
‘आप’च्या पराभवाची पाच प्रमुख कारणे:
1. दारू घोटाळ्याचा प्रभाव:
स्वच्छ राजकारणाचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षावर दारू घोटाळ्याचा डाग लागला. भाजपाने गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणात ‘आप’ला लक्ष्य केलं आणि मतदारांवर त्याचा परिणाम झाला.
2. भ्रष्टाचाराचे आरोप:
दारू घोटाळ्यासह दिल्ली जलबोर्ड घोटाळ्यासारखे आरोप ‘आप’वर लावण्यात आले. भाजपाने ही माहिती जोरदारपणे मतदारांपर्यंत पोहोचवली.
3. नेतृत्वावरील संभ्रम:
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे मुख्यमंत्रीपदावर कोण असेल, याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे मतदार असमंजसत होते आणि त्याचा फायदा भाजपाला झाला.
4. पक्षांतर्गत बंड:
निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे पक्षांतर्गत गोंधळ आणि अस्थिरतेचा संदेश मतदारांपर्यंत गेला.
5. काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ:
काँग्रेसला जागा जिंकता आली नसली तरी पक्षाच्या मतांमध्ये वाढ झाली. 2020 मध्ये 4.26% मतं मिळवणाऱ्या काँग्रेसला यावेळी 6.36% मतं मिळाली. काँग्रेसच्या मतवाढीचा थेट फटका ‘आप’ला बसला.
मतदान निकाल:
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत भाजपाला 45.80%, ‘आप’ला 43.79%, तर काँग्रेसला 6.36% मतं मिळाली आहेत. या आकडेवारीवरून दिल्लीतील सत्तांतर स्पष्ट होत आहे.
या निकालामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, भाजपाने तब्बल 27 वर्षांनी राजधानीत सत्ता मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading