कर्जत ( गणेश पवार ) : कर्जत तालुक्यात नेरळ जवळ असलेल्या दहिवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर बुध्द पौर्णिमेला रौप्य महोत्सवी वर्षाला बुध्द विहारमध्ये २फूट ६इंच उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
बौध्द तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, राहुल बोधी थेरो यांच्या उपस्थित बुध्द मुर्तीची बुध्द नाम जप करत भव्य मिरवणूक काढण्यात आली व त्याच्या हस्ते विहारात बुध्द रूप स्थापन करण्यात आले तसेच विहराचे नामकरण ‘ जेतवन बुध्द विहार ‘ असे करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रम धम्मदान संकल्पनेतून करण्यात आले या कार्यक्रमात नगरातील लहान थोर तसेच आम्रपाली महिला मंडळाने सुध्दा सहभाग घेतला
आद.भंते नी धम्म देशना देऊन मार्गदर्शन दिले, अध्यक्षा समवेत मंडळाचे उपाध्यक्ष अनिकेत गायकवाड, सचिव सचिन गायकवाड,सहसचिव प्रवीण गायकवाड,खजिनदार मयूर गायकवाड,तेजस गायकवाड भालचंद्र गायकवाड योगेश गायकवाड बंधु गायकवाड भारत गायकवाड संजय गायकवाड आणि सिद्धार्थ गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.