माथेरान ( मुकुंद रांजाणे ) : आज आई.सी.एस.ई. दिल्ली बोर्ड इयत्ता दहावी २०२३ चा निकाल जाहीर झाला. माथेरानच्या सेंट झेव्हीअर्स कॉन्व्हेंट हायस्कूल मधून कु फिझा फजल महापुळे हिने आजवरचे सर्व रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत ९४.२ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. सिद्धेश प्रसाद सावंत याने ९१.२% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.तर कु. देव गणपत मेवाड व कु.हिरेन प्रवीण खेर यांनी ८८ % गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.शाळेचा निकाल १०० % लागला असून स्थानिकांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
———————————————————
शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर पावलींन , शिक्षक योगेश जाधव व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी केलेल्या उत्तम प्रकारच्या मार्गदर्शन त्याचप्रमाणे पालक वर्गाने सुध्दा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे शाळेचा निकाल
१०० % लागला आहे माथेरानच्या प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चित कौतुकास्पद आहे यासाठी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
—सुनील शिंदे, माजी प्राध्यापक
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.