PEN न्यूज ऑनलाइन टीम :
अनेक जण दिवसाची सुरुवात एक कप ब्लॅक कॉफीने करतात. स्ट्राँग चव आणि कॅफिन किकसाठी ओळखली जाणारी ब्लॅक कॉफी ऊर्जा आणि चयापचय क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर मानली जाते.
फोर्टिस हॉस्पिटल, बंगळुरू येथील वरिष्ठ सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “एक महिना दररोज ब्लॅक कॉफी प्यायल्याने अनेक आरोग्याचे फायदे मिळू शकतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स, कॅफिन आणि व्हिटॅमिन्स बी शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतात.”
ब्लॅक कॉफीचे आरोग्यदायी फायदे:
✔ मानसिक सतर्कता वाढवते: कॅफिन मेंदूतील अॅडेनोसिन रिसेप्टर थांबवते, ज्यामुळे झोप येत नाही आणि उत्साह वाढतो.
✔ शारीरिक कार्यक्षमता सुधारते: रक्तप्रवाहात अॅड्रेनालाईनची पातळी वाढवून शरीराला अधिक ऊर्जावान बनवते.
✔ चयापचय क्षमता वाढवते: ३-११% ने चयापचय गती सुधारते आणि फॅट कमी करण्यास मदत करते.
✔ अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत: शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून पेशींचे आरोग्य सुधारते.
दररोजच्या जीवनशैलीत ब्लॅक कॉफीचा समावेश केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, मात्र प्रमाणात सेवन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे!
(टीप: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. . PEN न्यूज याची पुष्टी करत नाही.)