दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर भीषण विमान अपघात: 179 जणांचा मृत्यू, केवळ दोन प्रवासी बचावले

South Plane Crash
नवी दिल्ली : 
29 डिसेंबर रोजी दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून परतणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. 181 प्रवाशांना घेऊन लँडिंग करत असताना विमान धावपट्टीवरून घसरले आणि भिंतीला धडकले, ज्यामुळे मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला.
न्यूज एजन्सी एएफपीच्या बातमीनुसार, या दुर्घटनेत केवळ दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून उर्वरित 179 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भयानक होता की लँडिंगच्या काही क्षणांनंतरच विमान पूर्णतः आगीत होरपळून गेले. हा अपघात गेल्या पाच दिवसांतील दुसरा मोठा विमान अपघात आहे. याआधी 25 डिसेंबरला कझाकिस्तानमध्ये अजेरबैजान एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाले होते.
अपघातामुळे हळहळ व्यक्त होत असून, हवाई सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading