पेण पोलीस ठाणे हद्दीत ३१ डिसेंबर व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा उपाययोजना कडक करण्यात आल्या आहेत. यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहराच्या प्रवेशद्वारांवर विशेष लक्ष केंद्रित करून बोरगाव रोड, खोपोली बायपास मार्ग, नगरपालिका नाका, जुना पेट्रोल पंप या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान वाहनांची कसून तपासणी केली जाणार असून, दारू सेवन करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. याशिवाय, हद्दीतील फार्म हाऊस, हॉटेल्स आणि अन्य प्रेक्षणीय स्थळांवर स्वतंत्र तपासणीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पेण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे.
दरम्यान दिनांक ३० डिसेंबर रोजी रात्रौ ११ते ३ या वेळेत नाकाबंदी कारवाई मोहीम राबविली करण्यात आली, यावेळी दारूबंदी गुन्हयात ५१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर मोटार वाहून कायद्या अंतर्गत १८५ केसेस करण्यात आले यात ४५ चारचाकी, ३४ दुचाकीवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे ५ धाबे हॉटेल व ८ लॉजची तपासणी करण्यात आली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.