थकीत मालमत्ता धारकांवर माथेरान नगरपालिकेचा कारवाईचा बडगा

Matheran6
माथेरान (मुकुंद रांजणे) : 
प्रवासी कर आणि मालमत्ता कर या दोन मुख्य स्त्रोतांवर माथेरान नगरपरिषदेचे उत्पन्न अवलंबून आहे. परंतु अनेकदा मालमत्ता धारक हे वेळेवर आपला व कर भरत नसल्यामुळे नाईलाजाने नगरपरिषदेने शुक्रवार दिनांक  24 रोजी थकित मालमत्ताधारकांवर कारवाईचा बडगा उगारला असून पहिल्याच दिवशी एका हॉटेल धारकांच्या मालमत्तेला सील केले असता त्यांनी ताबडतोब थकीत रक्कम धनादेशाद्वारे जमा केल्याने तूर्तास तरी कारवाई टळली आहे.
अद्यापही अनेक मोठमोठ्या हॉटेल धारकांकडे अशाप्रकारे मालमत्ता कर थकीत असून पुढील आठ दिवसांत सर्व थकीत रक्कम नगरपरिषदेच्या तिजोरीत जमा न केल्यास त्यांच्या मालमत्तेला सील करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकारी वर्गाने सांगितले आहे.
आजवर अनेक हॉटेल धारकांनी घनकचरा व्यवस्थापन कामाचे सुध्दा थकीत रक्कम भरलेली नाही.ती सुद्धा वेळेत भरणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. आजच्या कारवाई वेळी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे, कार्यालय अधीक्षक सदानंद इंगळे, लेखापाल अंकुश इचके, भारत पाटील,स्वच्छता विभागाचे अन्सार महापुळे,लिपिका नेहा साकळकर,अर्जुन पारधी, करुणा बांगर, प्रवीण सुर्वे,वर्तक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading