
PEN न्यूज ऑनलाइन टीम : बरेच लोक गोळ्यांची पॅकेट आणतात आणि बिनधास्त घेतात. पण ते कधीच औषधांचं पाकीट बारकाईने किंवा त्यावरील गोष्टी बारकाईने बघत नाहीत. याने समस्या होऊ शकते.
तुम्ही कधी लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की, कही गोळ्यांच्या स्ट्रीपवर लाल रंगाची रेष असते. पण याचा अर्थ काय होतो हे माहीत आहे का? नाही ना? चला जाणून घेऊन या लाल रेषेचा अर्थ….
लाल रंगाच्या या रेषेबाबत डॉक्टरांना चांगलं माहीत असतं. पण सर्वसामान्य लोकांना याची काहीच माहिती नसते. अशात लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध मेडिकलमधून घेतात आणि नंतर त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ना हे औषध विकलं जाऊ शकत ना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करता येत. अॅंटी-बायोटिक औषधांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.