तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आलेले राज्यातील सर्वपक्षीय मातब्बर पंधराव्या विधानसभेत दिसतील का?

Voting1
मुंबई ( मिलिंद माने ) :
विधानसभा ही लोकशाहीचे महा मंदिर आहे जनता जनार्दन हीच त्यांची स्वयंभू सार्वभौम देवता आहे याच विधानसभे त आतापर्यंत तीन वेळा, चार वेळा ,पाच वेळा ,सहा वेळा ,सात वेळा, व आठ वेळा. निवडून आलेले सर्व पक्षातील मातब्बर नेते पंधराव्या विधानसभेत पुन्हा दिसतील? की नाही हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे.
राज्य पुनर्रचनेनंतर १९५७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर. तत्कालीन मुंबई राज्य द्विभाषिक विधानसभा व मुंबई राज्य पुनर्रचनेनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर ची.. महाराष्ट्र राज्याची पहिली विधानसभा अस्तित्वात आली त्यानंतर१९६२, १९६७, १९७२, १९८०, १९८५,१९९०, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ व आता होणाऱ्या२०२४ च्या . निवडणुकीने राज्यात पंधरावी विधानसभा अस्तित्वातील येईल.
राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर कलगीतुरा सर्वात मतदार संघात पाहण्यास मिळणार आहे शहानुभूती असली तरी “नोट दो होट लो “असे अर्थकारण२८८. विधानसभा मतदारसंघात राहणार आहे भावनेवर राजकारण महत्त्वाचे नाही आर्थिक स्तोत्रांची जुळवा जुळव महत्त्वाची आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी. ३ वेळा निवडून आलेले सदस्य ४७ आहेत ,तर ४ वेळा निवडून आलेले सदस्य२५ आहेत, तर ५ वेळा निवडून आलेले सदस्य ११ आहेत, तर ६ वेळा निवडून . आलेल्या सदस्यांची संख्या १० आहे, तर ७ वेळा निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ६ आहे तर ८ वेळा निवडून आलेले राज्यातील एकमेव सदस्य विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे असून हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या चिन्हावर सलग ८ वेळा निवडून आले आहेत.
राज्यातील ३ वेळा निवडून आलेले सदस्यांचे नावे मतदारसंघ व कालावधी पुढीलप्रमाणे;
९- शिरपूर अनुसूचित जमाती मतदार संघ
काशीराम वेचान पावरा (भाजपा पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१२ भुसावळ अनुसूचित जाती मतदारसंघ
संजय वामन सावकारे (भाजपा पक्ष) , २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१६ एरंडोल विधानसभा मतदारसंघ
चिमणराव रुपचंद पाटील (शिवसेना पक्ष), १९९९-२००४, २००९-२०१४, २०१९-२०२४
२५ मेहकर अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ
डॉक्टर संजय भास्करराव रायमुलकर (शिवसेना पक्ष), २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
३२ मुर्तीजापुर अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ
हरीश मारुती आप्पा पिंपळे (भारतीय जनता पक्ष), २००९-२०१४, २०१४_२०१९, २०१९-२०२४
३३ रिसोड विधानसभा मतदारसंघ
अमित सुभाषराव झनक (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) , में २०१४ ते ऑक्टोंबर२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
३५ कारंजा विधानसभा मतदारसंघ
राजेंद्र सुखां नंद पाटणी (भारतीय जनता पक्ष), २००४-२००९, २०१४-२०१९, २०१९-२०२४.
तर१९९८-२००४. या काळात ते विधान परिषद सदस्य होते
३७ बडनेरा विधानसभा मतदारसंघ
रवी गंगाधरराव राणा (अपक्ष), २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
३९ तिवसा विधानसभा मतदारसंघ
यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनवणे )
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष), २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९,२०२४
४१ मेळघाट अनुसूचित जाती विधानसभा मतदार संघ
राजकुमार दयाराम पटेल (प्रहार जनशक्ती पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २०१९-२०२४
५४ नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ कृष्णा पंचमजी खोपडे
(भारतीय जनता पक्ष), २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
५५ नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ विकास शंकरराव कुंभारे (भारतीय जनता पक्ष)
२००९-२०१४, २०१४-२०१९
२०१९-२०२४
१०१ जालना विधानसभा मतदारसंघ
कैलास किसनराव गोरंटयाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) १९९-२००४, २००९-२०१४, २०१९-२०२४
१०४ सिल्लोड विधानसभा मतदारसंघ
अब्दुल नबी सत्तार (शिवसेना पक्ष)
२००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१०८ औरंगाबाद पश्चिम अनुसूचित जाती मतदारसंघ
संजय पांडुरंग शिरसाट (शिवसेना पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१११ गंगापूर विधानसभा मतदारसंघ
प्रशांत बन्सीलाल बंब (भारतीय जनता पक्ष)
२००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४,
१२२ दिंडोरी अनुसूचित जाती मतदार संघ
नरहरी सिताराम झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
२००४-२००९, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ क्षितिज हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
२००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१४० अंबरनाथ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ
बालाजी प्रल्हाद किनीकर
(शिवसेना पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९_२०२४
१४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ गणपत काळू गायकवाड (भाजप) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघ
रवींद्र दत्तात्रय चव्हाण (भाजपा ) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ प्रताप बाबुराव सरनाईक (शिवसेना पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ जितेंद्र सतीश आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
२००९-२०१४, २०१४-२०१९, २०२९-२०२४
१५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ रविंद्र दत्ताराम वायकर (शिवसेना पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१६१ चारकोप विधानसभा मतदारसंघ
योगेश अमृतलाल सागर (भाजपा) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१६२ मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ असलम रमजान अली शेख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१६९ घाटकोपर पश्चिम मतदार संघ
राम शिवाजी कदम( भाजपा)
२००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१७१ मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ . अबू असीम आजमी (समाजवादी पक्ष)
२००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१८१ माहीम विधानसभा मतदारसंघ
सदानंद शंकर सरवणकर (शिवसेना पक्ष) २००४-२००९, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१८६ मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ
अमीन अमीर अली पटेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघ
प्रशांत रामशेठ ठाकूर (भाजपा) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१९४ महाड विधानसभा मतदारसंघ
भरत मारुती गोगावले (शिवसेना पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१९७ खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ दिलीप दत्तात्रय मोहिते पाटील
( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
२०३ भोर विधानसभा मतदारसंघ
संग्राम अनंतराव थोपटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ
लक्ष्मण पांडुरंग जगताप (भारतीय जनता पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२११ खडकवासला विधानसभा मतदारसंघ भीमराव धोंडीबा तापकीर (भारतीय जनता पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२१२ पर्वती विधानसभा मतदारसंघ
माधुरी सतीश मिसाळ (भाजपा) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२३५ लातूर शहर विधानसभा मतदारसंघ अमित विलासराव देशमुख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२३८ निलंगा विधानसभा मतदारसंघ
संभाजीराव दिलीपराव निलंगेकर पाटील
(भाजपा) २००४-२००९, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२४० उमरगा अनुसूचित जाती मतदारसंघ
ज्ञानराज धोंडीराम चौगुले (शिवसेना पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२४९ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ प्रणिती सुशीलकुमार शिंदे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघ
भारत तुकाराम भालके (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) सध्या समाधाना अवताडे विद्यमान आमदार२००९-२०१४
२०१४-२०१९, २०१९-२०२४
२५५ फलटण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती
दीपक प्रल्हाद चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
२००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२५६ वाई विधानसभा मतदारसंघ
मकरंद लक्ष्मणराव जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२५८ माण विधानसभा मतदारसंघ
जयकुमार भगवानराव गोरे (भाजपा) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२६१ पाटण विधानसभा मतदारसंघ
शंभूराज शिवाजीराव देसाई (शिवसेना पक्ष) २००४-२००९, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२६७ राजापूर विधानसभा मतदारसंघ
राजन प्रभाकर साळवी (शिवसेना पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२७० सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दीपक वसंतराव केसरकर (शिवसेना पक्ष) २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
……………………………..
राज्यातील चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेल्या आमदारांची संख्या २५ असून त्यांचे मतदारसंघ निहाय माहिती पुढील प्रमाणे;
८ सिंदखेड राजा मतदारसंघ
जयकुमार जितेंद्र सिंह रावल (भाजपा पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१४ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ गुलाबराव रघुनाथ पाटील (शिवसेना पक्ष)
१९९९-२००४, २००४-२००९, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२७ जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ डॉक्टर संजय श्रीराम कुटे (भाजपा पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
३४ वाशिम अनुसूचित जाती मतदारसंघ
लखन सहदेव मलिक (भाजपा पक्ष) १९९०-१९९५, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
४२ अचलपूर विधानसभा मतदारसंघ
बच्चू उर्फ ओम प्रकाश बाबुराव कडू
(प्रहार जनशक्ती पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
५७९ नागपूर तर अनुसूचित जाती मतदारसंघ
नितीन काशिनाथ राऊत (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
५९ रामटेक विधानसभा मतदारसंघ
एडवोकेट आशिष नंदकिशोर जयस्वाल
(अपक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
६२ साकोली विधानसभा मतदारसंघ
नानाभाऊ फालगुणराव पटोले
( राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
६९. अहेरी अनुसूचित जाती मतदारसंघ
धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९०-१९९५, १९९-२००४, २००४-२००९,
२०१९-२०२४
७३ ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ
विजय नामदेवराव वडेट्टीवार
(राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
७८ यवतमाळ विधानसभा मतदारसंघ
मदन मधुकरराव येरावार (भाजपा पक्ष) १९९६-१९९९, २००४२००९,
,२०१४-२०१९, २०१९-२०२४
७९ दिग्रस विधानसभा मतदारसंघ
संजय दुलीचंद राठोड (शिवसेना पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
८५ भोकर विधानसभा मतदारसंघ
अशोकराव शंकरराव चव्हाण
(राष्ट्रीय काँग्रेस) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
९९ परतुर विधानसभा मतदारसंघ
बबनराव दत्तात्रय लोणीकर- यादव.
(भाजपा पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २०१४-२०१९, २०१९-२०२४
११५ मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ दादाजी दगडू भुसे (शिवसेना पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१३५ शहापूर अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ
दौलत भिका दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९५-१९९९, १९९९-२००४, २००९-२०१४, २०१९-२०२४
१२० सिन्नर विधानसभा मतदारसंघ
एडवोकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
१४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ एकनाथ संभाजी शिंदे (शिवसेना पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१७८ धारावी अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ
वर्षा एकनाथ गायकवाड (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२२९ माजलगाव विधानसभा मतदारसंघ प्रकाश सुंदरराव सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
२४८ सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ विजयकुमार सिदब्रम्हप्पा देशमुख (भाजपा पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२६२ सातारा विधानसभा मतदारसंघ
शिवेंद्रसिंह राजे अभय सिंह राजे भोसले
( भाजपा पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२६६ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
उदय रवींद्र सामंत
( शिवसेना पक्ष) २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२७७ शाहुवाडी विधानसभा मतदारसंघ
विनय विलासराव कोरे (जनसुराज्य शक्ती पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
२८६ खानापूर विधानसभा मतदारसंघ
अनिल कलजेराव बाबर (शिवसेना पक्ष) १९९०-१९९५, १९९९-२००४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
………….. …. ………….
राज्यातील पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले आमदार व त्यांचे मतदार संघ यांची माहिती पुढील प्रमाणे;
२४ शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ राजेंद्र भास्करराव शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
४८ काटोल विधानसभा मतदारसंघ अनिल वसंतराव देशमुख
( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
४९ सावनेर विधानसभा मतदारसंघ
सुनील छत्रपाल केदार (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) १९९५-१९९९, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
५२ नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ देवेंद्र गंगाधर फडणवीस (भाजपा पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
९८ पाथरी विधानसभा मतदारसंघ
सुरेश अंबादासराव वरपूडकर
(राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) १९८६-१९९०, १९९०-१९९५, १९९५-१९९९, २००४-२००९, २०१९-२०२४
१०० धन सावंगी विधानसभा मतदारसंघ राजेश भैय्या अंकुशराव टोपे
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१७२ अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९६-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
२५९ कराड उत्तर मतदार संघ
शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२७३ कागल विधानसभा मतदारसंघ
हसन मियालाल मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ प्रकाश कल्लाप्पा आव्हाडे (अपक्ष ) १९८५-१९९०, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २०१९-२०२४
………. …. ….. ………….
६ वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेल्या आमदार व त्यांचे मतदार संघ पुढीलप्रमाणे
३ नंदुरबार अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित
( भाजपा पक्ष) १९९५-१९९९ , १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२८ अकोट विधानसभा मतदारसंघ प्रकाश गुणवंतराव भारसाकळे (भाजपा पक्ष) १९९०-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २०१४-२०१९, २०१९-२०२४
३० अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ गोवर्धन मांगीलालजी शर्मा (भाजपा पक्ष) १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार
( भाजपा पक्ष) १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१०६ फुलंब्री विधानसभा मतदारसंघ
हरिभाऊ किशनराव बागडे (भाजपा पक्ष) १९८५-१९९०, १९९०-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
११९ येवला विधानसभा मतदारसंघ
छगन चंद्रकांत भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
१९८५-१९९०, १९९०-१९९५ या दोन वेळा माजगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षावर यांनी निवडणूक लढवली होती
२००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
तसेच शिवसेना पक्षातून फुटल्यानंतर १९९६-२००२, २००२-२००४ दोन वेळा ते विधान परिषदेचे सदस्य होते
१३३ वसई विधानसभा मतदारसंघ
हितेंद्र विष्णू ठाकूर
बहुजन विकास आघाडी१९९०-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९
२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत वसई विधानसभा मतदारसंघातून विवेक पंडित यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून त्यांचा पराभव केला होता२०१४-२०१९, २०१९-२०२४
१८५ मलबार हिल विधानसभा मतदारसंघ मंगल प्रभात गुमान मल लोढा
(भाजपा पक्ष) १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२१८ शिर्डी विधानसभा मतदारसंघ राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील (भाजपा पक्ष) यांचा राजकीय प्रवास काँग्रेस शिवसेना व शेवटी भाजपा असा राहिला आहे१९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२४५ माढा विधानसभा मतदारसंघ
बबनराव विठ्ठलराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
१९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
…………. …………………
राज्यातील ७ वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले ६ आमदार व त्यांचे मतदार संघ पुढीलप्रमाणे;
१ अक्कलकुवा अनुसूचित जमाती मतदारसंघ एडवोकेट के .सी .पाडवी (राष्ट्रीय काँग्रेस) १९९०-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
१९६ आंबेगाव विधानसभा मतदारसंघ
दिलीप दत्तात्रेय वळसे पाटील
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९०-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२०१ बारामती विधानसभा मतदारसंघ
अजित अनंत पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९१-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९,
२०१९-२०२४
२८३ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जयंत राजाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १९९०-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
२२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ
बबनराव भिकाजी पाचपुते (भाजपा पक्ष )यांचा राजकीय प्रवास अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शेवटी भाजप१९८०-१९८५, १९८५-१९९०, १९९०-१९९५, १९९५-१९९९, २००४-२००९, २००९-२०१४, २०१९-२०२४
१८० वडाळा विधानसभा मतदारसंघ
कालिदास निळकंठ कोळंबकर (भाजपा पक्ष) यांचा राजकीय प्रवास शिवसेना शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेस व नंतर भाजप असा राहिला आहे१९९०-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४
…………………………….
८ वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेल्या आमदार व त्यांचे मतदारसंघ
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग ८ वेळा निवडून येण्याचा विक्रम विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात या मराठा नेत्यांनी केला आहे तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत त्यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा एकच राहिला आहे
२१७ संगमनेर विधानसभा मतदारसंघ
विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
(राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) १९८५-११९९०, १९९०-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading