रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी हनुमंत जैतू पाटील या आरोपीने कपडे बदल्याने तो पोलिसाच्या जाळ्यात अलगद फसला.
नेरळ पोलिस स्टेशन हद्दीतील पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील चिकन पाडा येथे गणेशोत्सवच्या दिवशी दिनांक 07/09/2024ते 08/09/2024 रोजी पहाटे सहाच्या दरम्यान आरोपी हनुमंत पाटील याने त्याचा सख्खा मोठा भाऊ मदन जैतू पाटील, गर्भवती वहिनी अनिशा पाटील, आणि पुतण्या विवेक पाटील यां तिघांचा कुऱ्हाडीने डोक्यात मारून हत्या करून त्यांचा मृतदेह घराच्या मागे असलेल्या नदीत फेकून दिले होते.
सदरच्या तिहेरी हत्याकांड घटनेची माहिती माहिती नेरळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांना पोशिर पोलीस पाटील राहुल राणे यांनी दुरध्वनीवर संपर्क साधुन कळविले की, चिकनपाडा गावाचे जवळ नदीमध्ये एक आठ ते दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह पडलेला आहे. सदरची माहीती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे हे नेरळ पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक,दहातोंडे व पथक यांच्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर वेळी घटनास्थळी गावातील लोक जमा झालेले होते. गावातील लोकंनी सदरचा मृतदेह ओळखला सदर मयत बालकास बाहेर काढुन त्याचे राहते घरी घेवुन गेले. सदर वेळी माहीती प्राप्त झाली की सदर बालकाचे आई वडील घरी नाही आहेत. सदर वेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी व गावातील लोकांनी नदीमध्ये शोध घेतला असता, नदी मधील बंधा-याच्या पडलेल्या भिंतीला अडकलेला बालकाची आई अनीशा पाटील हीचा मृतदेह आढळुन आला. त्यानंतर काही अंतरावर पाण्यामध्ये वडील मदन पाटील यांचादेखील मृतदेह आढळुन आला. सदर दोन्ही मृतदेह पाण्यामधुन बाहेर काढण्यात आले. त्यावेळी तीनही मृतदेहाची पाहणी केली असता, सदर तिनही मृतदेहाचे डोक्यावर, कपाळावर, कानावर धारदार हत्याराने मारुन केलेल्या गंभीर जखमा दिसुन आल्या सदर वेळी गावातील लोकंणनी पुरुष मृतदेह मदन पाटील महीला मृतदेह त्यांची पत्नी अनिषा उर्फ माधुरी पाटील यांचे असल्याचे सांगितले.
सपोनि शिवाजी ढवळे यांनी सदर घटनेची माहीती तात्काळ पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली.त्यानंतर सदरचे तीनही मृतदेह शवविच्छेदना करीता प्रथम उपजिल्हा रुग्नालय नेरळ या ठिकाणी पाठविले व नंतर जे.जे रुग्नालय मुंबई येथे पाठविण्यात आले.त्याचवेळी सदर घटनेची माहिती मदन पाटील यांच्या नातेवाईकांना देखील माहीती देण्यात आली.सदर घटनेचे गांभीर्य पाहुन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे अलिबाग येथुन घटनास्थळी रवाना झाले सदर वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जाधव, नियंत्रण कक्षाच्या सपोनि मनीषा लटपटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सरगल, पोसई गोसावी, पोसई नरे तसेच परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक पोसई गर्जे, पोसई घोलप, पोसई नवले, पोसई देवकाते, पोसई केद्रे पोसई अनुसया ढोणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी याना तात्काळ घटनास्थळी हजर राहण्याच्या सुचना दिल्या त्यानुसार पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे तसेच अधिकारी कर्मचारी सह घटनास्थळी दाखल झाले सदरवेळी घटनास्थळी कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे, खालापुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली प्रभारी पोनि राउत, खालापुर प्रभारी पोनि पवार, कर्जत प्रभारी पोनि गरड, नेरळ प्रभारी सपोनि ढवळे हे घटनास्थळी दाखल झाले होते.
सदर वेळी घटनास्थळाची पाहणी करुन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे सदर घटनेबाबत गुन्हा नोंद करणेबाबत नेरळचे सपोनी ढवळे यांना सुचना दिल्या व उपस्थित सर्व अधिका-याना सदर गुन्हयातील हत्या करणा-या मारेक-याचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या सदर वेळी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे याना सदर गुन्हयाचा समांतर तपास करुन तिहेरी हत्याकांडाचे हत्या करणा-या मारेक-याचे शोध घेवुन अटक करण्याची जबाबदारी सोपवित तातडीने या हत्याकांडाचा तपास पूर्ण झाले पाहिजे अशी ताकीद दिली.
नेरळ पोलीस ठाण्याचे सपोनी ढवळे यानी सदर हत्याकांडातील मयत महीला हिचा भाउ रुपेश यशवंत वेहले यांची फिर्याद घेवुन नेरळ पोलीस ठाणे गुन्हा रजीस्टर नंबर 184/2024 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 103(1),238 अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला.
सदर हत्याकांड तपासा दरम्यान माहीती प्राप्त झाली की, सदर गुन्हयातील मयत नामे मदन जैतु पाटील व त्याचा सख्खा भाऊ हनुमंत जैतु पाटील (अटक आरोपी) हे शेजारी शेजारी राहत असुन सदर घराची जागा मयताचे नावावर होती. तसेच दोन्ही भावांचे एकच रेशन कार्ड आहे. गेल्या बरेच वर्षापासुन मयताचा छोटा भाऊ (अटक आरोपी) हा मयताकडे सदर घराचा अर्धा हिस्सा त्याचे नावावर करुन दयावा तसेच स्वस्तदराने राशन खरेदी करण्याकरीता त्याचे कडे असलेला राशनकार्ड वरील नाव कमी करुन त्याचे स्वतंत्र राशनकार्ड काढुन दयावे या कारणावरुन काही वर्षापासुन भांडण करीत होता. बरेच वर्षापुर्वी त्यांने मयत भावास व त्याचे पत्नीस मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर बाबत त्यानी त्यांचे विरुध्द तक्रारी दिल्या होत्या व तेव्हा पासुन तो त्याना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देत होता.
नेरळ चिकणपाडा तिहेरी हत्याकांड बाबत पोलिसांच्या हाती काही पुरावे लागल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. तर या हत्याकांड बाबत पोलिसांचा संशय हा मयत मदन पाटील याचा भाऊ अर्थात हनुमंत पाटील यावर अधिक घट्ट झाला आहे. घराच्या जागेच्या वादाची या हत्याकांडाला किनार असल्याचे समजते. सदर घटने बाबत तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं.पोशिर येथील चिकन पाडा या गावात राहणारे मदन जैतु पाटील आणि त्याची पत्नी व मुलगा असे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली होती.दरम्यान ही हत्या नसून आत्महत्या वाटावी म्हणून आरोपिकडून मृतांचे मृतदेह पाण्यात टाकून बणाव रचण्यात आला होता.
आरोपी हनुमंत जैतु पाटील याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या पथकाने आरोपी हनुमंत पाटील यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर नेरळ पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी त्याचेकडे घटनेच्या रात्री तो कोठे होता? त्याची पत्नी कोठे होती? तो कोणाकडे गेला होता? कोणत्या रस्त्याने गेला होता? कोठे जेवण केले? कोठे कीती वेळ थांबला? कोणाला भेटला? कोठे झोपला? झोपताना बरोबर कोण होते? कोणते कपडे परीधान केले होते? व तो वापरत असलेला मोबाईल यासारखे प्रश्नावली तयार करीत सुमारे छत्तीस तास चौकशी करून सुद्धा आरोपी हा त्यांना दाद देत नव्हता. त्याने दिलेली माहीती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पडताळणी करुन शहानिशा केली. त्यावेळी असे दिसुन आले की, सदर मयाताचा भाऊ हनुमंत जैतु पाटील हा खोटी माहीती देवुन पोलीसांची दिशाभुल करीत आहे. त्यामुळे त्याचेवर अधिकच संशय बळावला प्रथम त्यांने सांगितलेली माहीती व तपासात शहानिशा केलेली माहीती याबाबत तफावत आढळून आली त्याला उलट सुलट प्रश्न करुन विचारणा केली असता तो गोंधळुन जात होता व दिशाभुल करत होता तपासात मिळालेली माहीती व सी.सी.टी.व्ही मार्फत त्याच्या हालचाली बाबत प्राप्त झालेली माहीती याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाडे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सतत उलट सुलट चौकशी चालु ठेवली शेवटी आरोपीस यास सोडून देण्याचा विचार करणार तेवढ्यात त्यांना आरोपी हा पोशीर आणि चिकन पाडा दरम्यान असणाऱ्या शाळेच्या बाजूला असणाऱ्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात सदर आरोपी हा दिसून आला मात्र त्याचा चेहरा दिसत नव्हता मात्र आरोपी चिकन पाडा येथे जाताना आरोपीच्या अंगात सफेद शर्ट होता तर तेथून येताना आरोपीने टी शर्ट परिधान केला होता. हे चित्र सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्याचे चित्रीकरण जेव्हा आरोपीस दाखवण्यात आले व त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने केलेली हत्याकांड कबुल केले.
त्यांनतर चौकशीत त्याने असे सांगितले की, गेली ब-याच वर्षापासुन त्याचा मयत मोठा भाऊ त्याला राहते घरामध्ये त्याचा हिस्सा नावे करु देत नव्हता स्वस्त दराने धान्य खरेदी करण्याकरीता राशनकार्ड देत नव्हता काही वर्षापुर्वी याच कारणावरुन भांडण झाले होते त्यावेळी त्यांनी पोलीसांत तक्रारी दिल्या होत्या भविष्यात त्याला त्याचा राहते घराचा हिस्सा त्याचे नावे तो करुन देणार नाही. याची मनोमन खात्री झाली व त्याला त्याचे घर त्याच्या नावे होणार नाही त्यामुळे त्यानाच संपविण्याचा मनात निर्धार केला. सध्या जोरदार पाउस पडत आहे. त्याचे घराचे मागील बाजुस दुथडी भरुन वाहणारी नदी आहे. तसेच मयताने त्याचे घरात श्रीगणेश स्थापणा केली आहे. त्यामुळे घराचा दरवाजा आतुन बंद केला जात नाही त्यामुळे त्याला घरात प्रवेश सहज होवु शकतो. त्याच रात्री त्याने पत्नी व मुलांना पत्नीचे माहेरी पाठवुन दिले. घटनेच्या रात्री त्याने स्वतःवर संशय येवु नये म्हणुन तो रात्री 08.00 वा. चे सुमारास वाजुलाच किमी अंतरावर असलेल्या पोशीर या गावात असणा-या चुलत मामाकडे गणपती दर्शनाकरीता गेला आणि तेथेच जेवण करुन पहिल्या माळावर झोपण्यासाठी गेला. व सर्व झोपी गेल्यानंतर तो रात्री भावाचे घरी येवुन मयत भाऊ मदन त्याची मयत पत्नी अनिषा उर्फ माधुरी व नउ वर्षाचा मुलगा असे गाढ झोपेत असताना धारदार कु-हाडीने तिघांचे डोक्यावर जोरजोराने सपासप घाव घालुन जागीच ठार केले रक्ताच्या चिंधड्या उड्डु नयेत म्हणुन त्याने त्यांचे अंगावर जाड कपडा टाकला ते तिघेही मृत झालेची खात्री झालेनंतर एक-एक मृतदेह घराचे पाठमागील असलेल्या नदीतील वाहत्या पाण्यात टाकुन दिले. व त्या नंतर घरात सांडलेले सर्व रक्त स्वच्छ धुवुन स्वतःचे कपडे बदलुन त्याचे संशय येवु नये म्हणुन रात्री झोपलेल्या पोशीर गावातील त्याचे चुलत मामाचे घरी पहाटे साडेपाच वाजता जावुन गणपतीचे समोर खुर्चीवर जावुन बसला. जेणेकरुन चुलत मामाना वाटेल की, तो रात्रीपासुन तेथेच आहे. परंतु तो जाताना येताना रस्त्यातील सी.सी.टी.व्ही मध्ये कैद झाला होता हे त्याला माहीत नव्हते. त्यास सदर गुन्हयात अटक केली असुन सदर गुन्हयाचा तपास कर्जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, यांचे मार्गदर्शनात कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, नेरळ पो.ठाणेचे प्रभारी सपोनि शिवाजी ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जाधव, नियंत्रण कक्षाच्या सपोनि मनिषा लटपटे, पोसई सरगर, पोसई नरे, पोसई गोसावी, तसेच परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक पोसई गर्जे, पोसई घोलप, पोसई नवले, पोसई देवकाते, पोसई केद्रे पोसई अनुसया ढोणे कर्मचारी सहा. फौज राजेंद्र पाटील, प्रसाद पाटील, यशवंत झेमसे, संदीप पाटील पोलिस हवालदार सुधीर मोरे, प्रतिक सावंत, जितेद्र चव्हाण, विकास खैरनार, राकेश म्हात्रे, प्रसन्न जोशी अस्मीता म्हात्रे, भाग्यश्री पाटील, अभयंती मोकल, पोलिस शिपाई अक्षय पाटील, स्वामी गावंड, मोरेश्वर ओमले, जगताप चालक पहेलकर, थळे,तसेच नेरळ पोलीस ठाणेचे पोलिस उप निरीक्षक नितीन मंडलिक,किसवे, पोलिस हवालदार वाघमारे, किसवे,वाणी, पोलिस केकान, दवणे, वागणेकर यांनी केली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.