तालुका काँग्रेस अध्यक्षपदी बाळाराम मोरे यांची तिसऱ्यांदा नियुक्ती

Balaram More
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तसेच काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पाईक कार्यकर्ते बाळाराम बाबाजीराव मोरे यांची सलग तिसऱ्यांदा पोलादपूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी ही नियुक्ती एका पत्राद्वारे जाहिर केली आहे.
194- महाड विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असून सद्यस्थितीत सर्वच पक्षांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू काँग्रेस पक्ष ठरल्याने बाळाराम मोरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस नियुक्तीनंतर सांगितले.
पोलादपूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित असलेल्या बाळाराम बा.मोरे यांच्या गेल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेकदा काँग्रेस पक्षसंघटना बांधून सुमारे 150 हून अधिक काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच तयार केला आहे. रायगड जिल्हयातील सहकार चळवळीमध्ये बारकावे माहिती असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या बाळाराम मोरे यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी संचालक पदाद्वारे सक्रीय योगदान दिले आहे. पोलादपूर तालुक्यातील पतसंस्था व सहकारी सोसायटयांच्या निर्मिती व कार्यक्षम कारभारासाठी आग्रही असताना बाळाराम मोरे यांनी सहकार खात्याला वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे.
सध्या 87 वर्षांचे धडाडीचे तरूण कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या बाळारामबुवांना सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांकडून सन्मानाने वागविले जात आहे. विविध विकासकामे कोणतीही सत्तास्थाने नसतानादेखील करता येत असल्याचे बाळाराम मोरे यांनी सांगताना सर्व राजकीय पक्षांमध्ये काँग्रेसजनांचा भरणा असून मधल्या काळात काँग्रेस पक्षांतील असंख्य कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करून गेल्यामुळे आता काँग्रेसची पक्षसंघटना अत्यल्प कार्यकर्त्यांची असल्याचे सकृतदर्शनी वाटत असले तरी काँग्रेस पक्षाकडेच देशाचा सक्षम कारभार करण्याची क्षमता असल्याचे सर्वांचे म्हणणे असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading