रोहा तालुक्यातील ऐनघर पंचक्रोशीमधिल श्री. क्षेत्र तामसोली या ठिकाणी गुरुवार दि. २७ ते रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वा. सु. नि. गुरूवर्य अलिबागकर बाबा, यांच्या कृपाछत्राखाली , स्वा. सु. नि. गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे, स्वा. सु. नि. गुरुवर्य धोंडु बाबा कोल्हटकर व स्वा. सु. नि. गुरुवर्य काशिनाथ बाबा मोरे यांच्या कृपाशीर्वादाने ह. भ. प. नारायणदादा वाजे ( मठाधिपती पंढरपूर) तसेच ह भ.प. दत्तु महाराज कोल्हटकर व ह.भ.प. भरत महाराज वाजे अलिबागकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे
या दररोजच्या कार्यक्रमांमध्ये काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, किर्तन व हरीजागर होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व तामसोली ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन, कळशपुजन, ध्वजारोहण करुन कार्यक्रमाची सुरुवात होईल. तसेच पहिल्या दिवशी गुरुवार (दि.२७) रोजी ह. भ.प. डॉ. ज्ञानेश्वर महाराज हाडपे ( नागोठणे) यांचे प्रवचन तर ह. भ. प. बबन महाराज वांजळे ( नारायणगाव) यांचे किर्तन, ( दि. २८) रोजी ह.भ.प. दिनेश महाराज कडव ( वांदोली) यांचे प्रवचन तर ह.भ.प. डॉ.किरण महाराज कुंभार ( धोंडसे) यांची किर्तन सेवा होईल.तसेच ( दि.२९) रोजी ह.भ. प. मधुकर महाराज जवके यांचें प्रवचन व ह. भ. प. गुरुवर्य डॉ. मारुती महाराज कोल्हटकर यांचे किर्तन होईल.
तसेच रविवार (दि.३०) रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ह.भ.प. गुरुवर्य नारायणदादा वाजे अलिबागकर महाराज यांचे काल्याचे किर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या भव्यदिव्य कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळ, वाघेश्वर मंडळ, ओम साई क्रिकेट, महिला मंडळ तसेच नवतरुण मित्र मंडळ तामसोली यांनी केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.