तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी, ४०० जागांसाठी मेगा भरती

Npcil
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)मध्ये 400 पदांसाठी मेघा भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असणार आहे.
रिक्त पदे आणि पदसंख्या :
  • एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (Executive Trainees) या पदाच्या एकूण ४०० रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
  • केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल आदी क्षेत्रांतील ही पदे आहेत.
वयोमर्यादा:
  • एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे यादरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता :
  • उमेदवारांनी संबंधित शाखेतून बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा इन्स्टिट्यूटमधून इंडस्ट्रियल आणि फायर सेफ्टी विषयात किमान ६० टक्के गुण असावेत.
पगार :
  •  उमेदवारांना महिन्याला ५५ हजार रुपये पगार मिळेल.
अधिकृत वेबसाइट :
  • http://www.npcilcareers.co.in
अधिक माहितीसाठी PDF जाहिरात एकदा वाचून घ्यावी.
  • https://www.npcilcareers.co.in/ETHQ20243004/candidate/Default.aspx
  • उमेदवार थेट https://www.npcilcareers.co.in/MainSiten/DefaultInfo.aspx या लिंकवरून अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क :
  • जनरल, ईडब्ल्यूएस व ओबीसी श्रेणीतील फक्त पुरुष अर्जदारांसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क आहे. तसेच एससी/ एसटी प्रवर्गातील महिला अर्जदार, पीडब्ल्यूबीडी, माजी सैनिक यांना अर्ज शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे.
  • Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading