ढोल ताशाच्या गजरात एकमेकांना पेढे भरून श्रीरंग बारणे यांच्या विजयाचा कर्जतमध्ये जल्लोष

Thorave Office Karjat
कर्जत ( गणेश पवार ) :

देशाच्या १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडून त्याचे निकाल आज दिनांक ४ जून रोजी घोषित करण्यात येत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा मतदारसंघ होता. मात्र प्रत्यक्ष निकालावेळी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होताच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतलेली आघाडी हि शेवटपर्यंत तशीच राहिली. त्यामुळे दुपारी हि आघाडी १९ फेऱ्याअंती १ लाखांच्या घरात गेल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कर्जतमध्ये मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेठे भरवत हा जल्लोष केला जात असल्याचे चित्र होते.

लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असल्याने सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली असल्याचे चित्र कर्जत विधानसभा मतदारसंघात होते. सकाळपासून कर्जत नेरळ सारख्या मोठ्या शहरांच्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत होता. तर नेरळ येथे महावीर पेठेत भाजपकडून निकालाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तर कर्जतमध्ये सर्व पक्षांच्या कार्यालयामध्ये निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होती. तर नागरिकही निकाल पाहण्यात गुंतले होते.
दरम्यान महायुतीचे उमेदवार शिरंग बारणे यांनी निकालावेळी घेतलेली आघाडी कुठेच कमी न झाल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याने दुपारी १ वाजता कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. शिंदे गट शिवसेनेच्या शिवसैनिकांनी कर्जत येथील बाळासाहेब भवन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालय तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी केली. तर एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष साजरा केला.
मावळ लोकसभा मतदार संघातून ९६,६१५ मतानी श्रीरंग अप्पा बारणे विजयी झाल्याचे घोषित झाल्यानंतर नेरळ शहरात नेरळ शहर भाजपा व शिंदे गट शिवसेना नेरळ शहर यांच्या वत्तीने नेरळ बाजारपेठेत ढोल ताशाच्या गजरात विजयी मिरवणुक काढत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विजय उत्सव साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading