
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोह्याचे सुपुत्र आणि देशाचे थोर अर्थमंत्री स्व. डाॅ. सी. डी. तथा चिंतामणराव देशमुख यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधत मंगळवार दि.१४ जाने रोजी सायं. ५:३० वा.श्री.राम मारूती चौक, रोहा.येथे भव्य वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारी तसेच शैक्षणिक कला – क्रीडा सांस्कृती वारसा जोपासणाऱ्या रोहा प्रेस क्लबच्या सहभागातून आणि सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान, अभिनव रोहा, शिवचरण मित्र मंडळ, राजमुद्रा फाऊंडेशन, स्पंदन नाट्यसंस्था, मावळा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ रोहा व श्री कृपा फाऊंडेशन, रोहा युवा आदी युवा संघटनांच्या वतीने शहरातील राम मारूती चौक येथे भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी लहान गट इ.७ वी ते १२ वी विषय १.नैसर्गिक शेती आज काळाची गरज,२.माॅं साहेब जिजाऊ चरित्रातून काय शिकावे ? ३.वणवा, ज्वलंत विचारांची दाहकता, कारणीभूत कोण? ४.क्रिक्रेट खेळ की फॅशन,५.सोशल मिडिया अतिवापर कितपत योग्य तर प्रथम वर्ष वरिष्ठ महाविद्यालय १३ वी व पुढे खुला गट विषय-१.लग्नासाठी मुलीचं नाहीत-वास्तवता आणि कारण, २.निवडणुकीत पैशाचा घोडेबाजार लोकशाहीला तारक की मारक, ३.बदलते शैक्षणिक धोरण शाप की वरदान, ४.वाहतूक नियमांची पायमल्ली, अपघाताला निमंत्रण, ५.भलतीच स्टंटबाजी मृत्यूला आमंत्रण आदी विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी सुहास खरिवले ९६६५१६९६६६ रोशन चाफेकर ८८८८०५६०९३ नंदकुमार मरवडे ८३०८६८८२२९ व रविंद्र कान्हेकर ९९७५५०८५९२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.