डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात रेझिंग डे संपन्न; दिघी सागरी पोलिसांचं मार्गदर्शन

Borli Police With Student
बोर्ली पंचतन (मकरंद जाधव) : 
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीन ‘रेझिंग डे’ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. त्याच अनुषंगाने दिघी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार दि.७ जानेवारी रोजी रेझिंग डे आयोजित करण्यात आला.
पोलिसांचा जनतेशी असणारा संपर्क वाढावा,तो अधिक वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचं कामकाज कसं चालतं याविषयी माहिती दिली. आता प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलमुळे डिजिटल पेमेंट म्हणजेच ऑनलाइन आर्थिक व्यवहार वाढले आहेत हीच संधी साधून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चोरटेदेखील आता ऑनलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूक करुन आपल्या बँक खात्यातील पैसे क्षणात गायब करीत आहेत. त्याबाबत आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबाबत जागरुकता निर्माण होऊन बाल लैंगिक शोषणाच्या घटना टाळण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन करतानाच तुमच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल तर तुम्ही पोलिसांकडे या आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करु असा विश्वास देतानाच कोणतीही चांगली वाईट गोष्ट लपवून न ठेवता आई-वडील शिक्षक आणि मित्र- मैत्रिणींजवळ बोला असा सल्ला दिला.
याप्रसंगी पोलीस कर्मचारी उल्हास चौलकर,शाळा व्यवस्थापन समितीचे चंद्रमणी मोरे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता सातवी ते बारावीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिसबा पुरकर यांनी तर विद्यार्थ्यांजवळ संवाद साधून विविध विषयांवर केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मुख्याध्यापक सचिन मापुस्कर यांनी पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading