डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 68 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त पेणकरांनी वाहीली आदरांजली

Pen Dr Ambetkar Stachu

पेण :
विश्वरत्न तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरीनिर्वाण दिनी पेणच्या नागरिकांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
यावेळी पेण येथील बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई सोनवणे, रिपब्लिकन नेते एम.डी. कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सितारामपंत कांबळे, भाजप नेते भास्कर पाटील, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष प्रभाकर घायतळे, युवा नेते सुर्वे, बौद्धाचार्य रोहिदास गायकवाड, बहुजन विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष नागेश सुर्वे, बहुजन विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष समीर घायतळे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश नागोटकर, युवा सेनेचे उपशहर प्रमुख नरेश भालेराव, रिपाई नेते विनोद जोशी, युवा नेते सिद्धांत घायतळे, प्राध्यापक दामिनी घायतळे, सामाजिक कार्यकर्ते दिपक सोनवणे आदींसह भिमसैनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेणमध्ये आदरांजली वाहिल्यानंतर तालुक्यातील शेकडो भीमसैनिकांनी मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading